एका गोलंदाजासमोर अख्खा संघ ढेपाळला, 4.5 षटकात 12 धावात घेतल्या 10 विकेट

एका गोलंदाजासमोर अख्खा संघ ढेपाळला, 4.5 षटकात 12 धावात घेतल्या 10 विकेट

फलंदाजी करताना 49 धावांची खेळी आणि त्यानंतर भेदक गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघालाच तंबूत धाडलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत अशी कामगिरी दोनच वेळा झाली आहे.

  • Share this:

कडापा, 25 फेब्रुवारी : आंध्र प्रदेशात सुरु असलेल्या महिला अंडर 19 क्रिकेट सामन्यात एका वेगवान गोलंदाजाने प्रतिस्पर्धी संघ तंबूत धाडला. चंदिगढची वेगवान गोलंदाज आणि कर्णधार काशवी गौतम हिने अरुणाचलविरुद्ध धमाकेदार कामगिरी केली. तिच्या गोलंदाजीसमोर अरुणाचलची एकही खेळाडू तग धरू शकली नाही. काशवीने 4.5 षटकात 12 धावा देत प्रतिस्पर्धी संघाच्या 10 फलंदाजांना बाद केलं. यामुळे अरुणाचलचा संघ 25 धावात गुंडाळला. हा सामना चंदिगढने 161 धावांनी जिंकला. विशेष म्हणजे काशवीने फलंदाजी करताना 68 चेंडूत 49 धावांची खेळी केली होती.

चंदिगढच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना फक्त 186 धावा केल्या होत्या. सामना जिंकण्यासाठी संघाला लवकर विकेट घेण्याची गरज होती. तेव्हा कर्णधार  काशवीने स्वत:च नव्या चेंडूवर जोखीम पत्करली. तिने पहिल्याच षटकात दोन फलंदाज बाद केले. त्यानंतर दुसऱ्या षटकात शेवटच्या तीन चेंडूवर तीन गडी बाद करून हॅटट्रिक केली. त्यानंतर तिसऱ्या षटकात दोन आणि चौथ्या षटकात तीन गडी बाद केले.

काशवीच्या माऱ्यासमोर अरुणाचलच्या 8 फलंदाजांना खातंही उघडता आलं नाही. अरुणाचलकडून फक्त इतिका त्यागीने 10 धावा केल्या. याशिवाय चंदिगढच्या गोलंदाजांनी 8 अवांतर धावा दिल्या.

वाचा : धवन म्हणाला 'गब्बर इज बॅक'! फिल्मी स्टाईल फोटो शेअर करत केली कमबॅकची घोषणा

याआधी वेगवान गोलंदाज रॅक्स सिंगने एका डावात 10 गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता. 2018 मध्ये मणिपूरकडून खेळताना अरुणाचलविरुद्ध अशी कामगिरी केली होती.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी दोन गोलंदाजांच्या नावावर आहे. सर्वात आधी 1956 मध्ये इंग्लंडचा फिरकीपटू जिम लेकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका डावात 10 गडी बाद केले होते. त्यानंतर भारताचा फिरकीपटू अनिल कुंबळेने 1999 मध्ये कोटला कसोटीत पाकचा संघ तंबूत धाडला होता.

VIDEO : कधी काळी मुलगा बनून खेळायची क्रिकेट! आता झाली 'लेडी सेहवाग'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Feb 25, 2020 07:32 PM IST

ताज्या बातम्या