• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • काश्मीर प्रीमियर लीग : शाहिद आफ्रिदी परत बरळला, BCCI वर केले आरोप

काश्मीर प्रीमियर लीग : शाहिद आफ्रिदी परत बरळला, BCCI वर केले आरोप

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू हर्षल गिब्ज (Herschelle Gibbs) याने काश्मीर प्रीमियर लीगवरून (Kashmir Premier League) बीसीसीआयवर (BCCI) दबाव टाकत असल्याचा आरोप केला. या वादामध्ये आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी (shahid afridi) यानेही उडी घेतली आहे.

  • Share this:
    मुंबई, 1 ऑगस्ट : दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू हर्षल गिब्ज (Herschelle Gibbs) याने काश्मीर प्रीमियर लीगवरून (Kashmir Premier League) बीसीसीआयवर (BCCI) दबाव टाकत असल्याचा आरोप केला. या वादामध्ये आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी (shahid afridi) यानेही उडी घेतली आहे. यानंतर अनेक जणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आफ्रिदीवर निशाणा साधला. काश्मीर प्रीमियर लीगमध्ये हर्षल गिब्ज, तिलकरत्ने दिलशान, मॉन्टी पनेसार हे क्रिकेटपटू खेळणार आहेत. काय म्हणाला हर्षल गिब्ज? पाकिस्तानसोबत आपला राजकीय अजेंडा राबवला जात आहे, काश्मीर प्रीमियर लीग खेळू नये म्हणून बीसीसीआय अशा गोष्टी करत आहे, ज्याची गरज नाही. क्रिकेटसंबधी कोणत्याही गोष्टींसाठी भारतात येऊ देणार नाही, अशी धमकीही मला दिली जात आहे, हे चुकीचं आहे, असं ट्वीट हर्षल गिब्जने केलं. हर्षल गिब्जच्या या ट्वीटवर शाहिद आफ्रिदीने प्रतिक्रिया दिली. 'बीसीसीआय पुन्हा एकदा क्रिकेट आणि राजकारण एकत्र करत आहे. काश्मीर प्रीमियर लीग काश्मीर, पाकिस्तान आणि जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांसाठी आहे. आम्ही या स्पर्धेचं उत्कृष्ट आयोजन करू. अशा प्रकारामुळे आम्ही अजिबात विचलित होणार नाही,' असं आफ्रिदी म्हणाला. काश्मीर प्रीमियर लीगला या महिन्यापासून सुरुवात होणार आहे. या लीगमध्ये हर्षल गिब्ज, तिलकरत्ने दिलशान, मॉन्टी पनेसार यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळणार आहेत. लीगमध्ये ओवरसीज वॉरियर्स, मुजफ्फराबाद टायगर्स, रावळकोट हॉक्स, बाग स्टालियन, मीरपूर रॉयल्स आणि कोटली लायन्स या 6 टीम सहभागी होणार आहेत. काश्मीर प्रीमियर लीगवरून BCCI ने पाकिस्तानला दिलं सडेतोड प्रत्युत्तर काश्मीर प्रीमियर लीगच्या टीमचं नेतृत्व इमाद वसीम, मोहम्मद हफीज, शाहिद आफ्रिदी, शादाब खान, शोएब मलिक आणि कामरान अकमल करणार आहेत. प्रत्येक टीममध्ये पाकव्याप्त काश्मीरमधले 5 क्रिकेटपटू असतील. काश्मीर प्रीमियर लीगच्या या मोसमाचं आयोजन यावर्षी मे महिन्यात होणार आहे, पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला स्पर्धा स्थगित करावी लागली होती, कारण पाकिस्तान सुपर लीग त्यावेळी पूर्ण झाली नव्हती.
    Published by:Shreyas
    First published: