• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • KPL : BCCI च्या धक्क्यानंतर या क्रिकेटपटूने घेतली काश्मीर प्रीमियर लीगमधून माघार

KPL : BCCI च्या धक्क्यानंतर या क्रिकेटपटूने घेतली काश्मीर प्रीमियर लीगमधून माघार

क्रिकेटच्या माध्यमातून काश्मीर मुद्द्याला हवा देण्याचं काम करणाऱ्या पाकिस्तानला मोठा धक्का लागला आहे. इंग्लंडचा माजी स्पिनर मॉन्टी पनेसार (Monty Panesar) याने बीसीसीआयच्या (BCCI) इशाऱ्यानंतर काश्मीर प्रीमियर लीग (Kashmir Premier League) मधून माघार घेतली आहे.

 • Share this:
  मुंबई, 2 ऑगस्ट : क्रिकेटच्या माध्यमातून काश्मीर मुद्द्याला हवा देण्याचं काम करणाऱ्या पाकिस्तानला मोठा धक्का लागला आहे. इंग्लंडचा माजी स्पिनर मॉन्टी पनेसार (Monty Panesar) याने बीसीसीआयच्या (BCCI) इशाऱ्यानंतर काश्मीर प्रीमियर लीग (Kashmir Premier League) मधून माघार घेतली आहे. पाकिस्तानच्या काश्मीर प्रीमियर लीगमध्ये आपण भाग घेणार नाही, असं मॉन्टी पनेसार म्हणाला आहे. तसंच त्याने इतर खेळाडूंना या लीगमध्ये खेळण्यापासून सावध राहण्याचा सल्लाही दिला. रिपब्लिक भारतसोबत बोलताना पनेसार म्हणाला, 'मला केपीएल खेळण्याची संधी मिळाली तेव्हा मला वाटलं की पुन्हा एकदा मैदानात उतरायला मिळेल. पण जे खेळाडू काश्मीर प्रीमियर लीगमध्ये खेळतील त्यांना परिणाम भोगावे लागतील, असा इशारा बीसीसीआयने खेळाडूंना दिला. मी स्पोर्ट्स मीडियामध्ये आपलं करियर सुरू करत आहे, त्यामुळे मला भारतात काम करायचं आहे. म्हणूनच मी काश्मीर प्रीमियर लीगमध्ये न खेळणंच योग्य राहिल. मला क्रिकेट आणि राजकारणात पडायचं नाही.' 'मी एक खेळाडू आहे, हळू हळू पुन्हा खेळणं सुरू करून पुनरागमन करण्याचा माझा विचार होता. पण विचार केल्यानंतर केपीएल खेळणं खूप धोकादायक आहे. माझ्यासाठी या लीगमध्ये न खेळणंच योग्य आहे. सुरक्षेची चिंता करू नका, यातून क्रिकेटला चालना मिळेल, असं मला सांगण्यात आलं होतं. मला भारत-पाकिस्तान वादात अडकायचं नाही. भारत-पाकिस्तान यांच्यात चांगले संबंध असावेत, हीच माझी इच्छा आहे,' अशी प्रतिक्रिया मॉन्टी पनेसारने दिली. मॉन्टी पनेसारने याचसोबत इतर खेळाडूंनाही सल्ला दिला. जर आपण लीग खेळलो नाही, तर आपल्याला भारतात काम करण्याची संधी मिळणार नाही. आम्हाला भारतात कॉमेंट्री कोचिंग करायचं आहे. मला इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आदेश दिला आहे. जर दुसरे खेळाडू केपीएलमध्ये खेळणार असतील, तर त्यांना याच्या परिणांबाबत माहिती पाहिजे, असं मॉन्टी पनेसार म्हणाला. KPL : काश्मीर प्रीमियर लीगचा वाद वाढला, BCCI चं ICC ला पत्र याआधी दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू हर्षल गिब्ज (Herschelle Gibbs) यानेही बीसीसीआयवर आरोप केले. काश्मीर प्रीमियर लीगमध्ये भाग न घेण्यासाठी बीसीसीआय खेळाडूंवर दबाव टाकत आहे, असा आरोप गिब्जने केला आहे. पाकिस्तानसोबत आपला राजकीय अजेंडा राबवला जात आहे, काश्मीर प्रीमियर लीग खेळू नये म्हणून बीसीसीआय अशा गोष्टी करत आहे, ज्याची गरज नाही. क्रिकेटसंबधी कोणत्याही गोष्टींसाठी भारतात येऊ देणार नाही, अशी धमकीही मला दिली जात आहे, हे चुकीचं आहे, असं ट्वीट हर्षल गिब्जने केलं. काश्मीर प्रीमयिर लीगचं आयोजन 6 ऑगस्टपासून होणार आहे. या लीगमध्ये हर्षल गिब्ज, तिलकरत्ने दिलशान (Tilakratne Dilshan) यांच्यासारखे मोठे खेळाडूही खेळताना दिसण्याची शक्यता आहे. लीगमध्ये ओवरसीज वॉरियर्स, मुजफ्फराबाद टायगर्स, रावळकोट हॉक्स, बाग स्टालियन, मीरपूर रॉयल्स आणि कोटली लायन्स या 6 टीम सहभागी होणार आहेत. काश्मीर प्रीमियर लीगच्या टीमचं नेतृत्व इमाद वसीम, मोहम्मद हफीज, शाहिद आफ्रिदी, शादाब खान, शोएब मलिक आणि कामरान अकमल करणार आहेत. प्रत्येक टीममध्ये पाकव्याप्त काश्मीरमधले 5 क्रिकेटपटू असतील.
  Published by:Shreyas
  First published: