Home /News /sport /

काश्मीर प्रीमियर लीगवरून दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज क्रिकेटपटूचा BCCI वर आरोप

काश्मीर प्रीमियर लीगवरून दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज क्रिकेटपटूचा BCCI वर आरोप

काश्मीर प्रीमियर लीगवरून (Kashimr Premier League) आता नवा वाद निर्माण झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू हर्षल गिब्ज (Herschelle Gibbs) याने या स्पर्धेवरून बीसीसीआयवर (BCCI) निशाणा साधला आहे.

    मुंबई, 31 जुलै : काश्मीर प्रीमियर लीगवरून (Kashimr Premier League)  आता नवा वाद निर्माण झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू हर्षल गिब्ज (Herschelle Gibbs) याने या स्पर्धेवरून बीसीसीआयवर (BCCI) निशाणा साधला आहे. काश्मीर प्रीमियर लीगमध्ये भाग न घेण्यासाठी बीसीसीआय खेळाडूंवर दबाव टाकत आहे, असा आरोप गिब्जने केला आहे. पाकिस्तानसोबत आपला राजकीय अजेंडा राबवला जात आहे, काश्मीर प्रीमियर लीग खेळू नये म्हणून बीसीसीआय अशा गोष्टी करत आहे, ज्याची गरज नाही. क्रिकेटसंबधी कोणत्याही गोष्टींसाठी भारतात येऊ देणार नाही, अशी धमकीही मला दिली जात आहे, हे चुकीचं आहे, असं ट्वीट हर्षल गिब्जने केलं आहे. काश्मीर प्रीमियर लीगला पुढच्या महिन्यापासून सुरुवात होणार आहे. या लीगमध्ये हर्षल गिब्ज, तिलकरत्ने दिलशान, मॉन्टी पनेसार यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळणार आहेत. लीगमध्ये ओवरसीज वॉरियर्स, मुजफ्फराबाद टायगर्स, रावळकोट हॉक्स, बाग स्टालियन, मीरपूर रॉयल्स आणि कोटली लायन्स या 6 टीम सहभागी होणार आहेत. काश्मीर प्रीमियर लीगच्या टीमचं नेतृत्व इमाद वसीम, मोहम्मद हफीज, शाहिद आफ्रिदी, शादाब खान, शोएब मलिक आणि कामरान अकमल करणार आहेत. प्रत्येक टीममध्ये पाकव्याप्त काश्मीरमधले 5 क्रिकेटपटू असतील. काश्मीर प्रीमियर लीगच्या या मोसमाचं आयोजन यावर्षी मे महिन्यात होणार आहे, पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला स्पर्धा स्थगित करावी लागली होती, कारण पाकिस्तान सुपर लीग त्यावेळी पूर्ण झाली नव्हती.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, Pakistan

    पुढील बातम्या