क्रिकेट संघाच्या कर्णधारासह खेळाडू बेपत्ता, काश्मीरमध्ये जाहीरात देऊन शोध सुरू

क्रिकेट संघाच्या कर्णधारासह खेळाडू बेपत्ता, काश्मीरमध्ये जाहीरात देऊन शोध सुरू

काश्मीरमधील क्रिकेटपटूंशी कोणताही संपर्क होत नसल्यानं जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशनने टीव्हीवरून जाहीरात देऊन शिबिरात सहभागी होण्याची

  • Share this:

श्रीनगर, 28 ऑगस्ट : काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर तिथलं वातावरण तणावपूर्ण झालं आहे. दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधील क्रिकेट असोसिएशनने खेळाडूंचा शोध सुरू केला आहे. त्यांनी टीव्ही चॅनलवर जाहीरातीची मदत घेतली आहे. कलम 370 हटवल्यानंतर तिथले खेळाडू जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या संपर्कात नाहीत. यामध्ये कर्णधार परवेज रसूल याचाही समावेश आहे. असोसिएशनला माहिती नाही की खेळाडू कुठे आहेत. त्यांचे फोनही लागत नाहीत. त्यामुळं असोसिएशननं संपर्क करण्यासाठी स्थानिक टीव्ही चॅनेल्सवर जाहीरात दिली आहे.

जाहीरातीच्या माध्यमातून असोसिएशनने शुक्रवारपासून जम्मू काश्मीरमध्ये सुरु होणाऱ्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्याचं आवाहन प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंना करण्यात आलं आहे. दिल्लीत झालेल्या का बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये जम्मू काश्मीरच्या संघाचा मेंटर आणि भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण, सीके प्रसाद, जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे सीईओ साह बुखारी हेसुद्धा होते.

बुखारी यांनी सांगितलं की, सध्या काश्मीरमध्ये दोन स्थानिक चॅनल आहेत. सुरुवातीला वृत्तपत्रात जाहीरात देण्याचा विचार होता पण संपूर्ण काश्मीरमध्ये वृत्तपत्र पोहचतं की नाही हे माहिती नाही. यामुळं टीव्हीवरून जाहीरात देण्याचा निर्णय घेण्यात आला. खेळाडूंना सुचना देण्यासाठी हा सर्वात चांगला मार्ग असल्याचंही त्यांनी म्हटलं.

गेल्या तीन आठवड्यांपासून अनेक खेळाडूंबद्दल असोसिएशनला माहिती नाही. कर्णधार परवेज रसूल याच्याशी आठवड्याभरापूर्वी चर्चा झाली होती. त्यानं सांगितलं होतं की, प्रशिक्षणासाठी तो आला होता मात्र तिथं काहीच हालचाल न दिसल्यानं परत गेला.

इरफान पठाण म्हणाला की, आम्ही परवेज रसूलच्या घरी त्याला शोधण्यासाठी माणसं पाठवण्याचाही विचार केला होता. मात्र, ते शक्य नव्हतं. यासाठी टीव्ही हे योग्य माध्यम आहे. एकदा संपूर्ण संघ एकत्र आला पाहिजे. असोसिएशन त्यांच्या राहण्याची व्यवस्था करेल आणि त्यानंतर शिबिर कुठे घ्यायचं याचा निर्णय घेतला जाईल.

बोटीत जाण्याआधी भरधाव ट्रक कोसळला थेट समुद्रात, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2019 12:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading