Home /News /sport /

पाकिस्तानने पुन्हा नाक खुपसलं, काश्मीर प्रीमियर लीग होणार, हे क्रिकेटपटू खेळणार!

पाकिस्तानने पुन्हा नाक खुपसलं, काश्मीर प्रीमियर लीग होणार, हे क्रिकेटपटू खेळणार!

पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीर प्रकरणात नाक खुपसलं आहे. यावेळी क्रिकेटच्या माध्यमातून त्यांनी काश्मीर मुद्द्याला हात घातला आहे. पाकिस्तानने काश्मीर प्रीमियर लीग (Kashmir Premier League) खेळवण्याचा घाट घातला आहे.

    मुंबई, 5 जुलै : पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीर प्रकरणात नाक खुपसलं आहे. यावेळी क्रिकेटच्या माध्यमातून त्यांनी काश्मीर मुद्द्याला हात घातला आहे. पाकिस्तानने काश्मीर प्रीमियर लीग (Kashmir Premier League) खेळवण्याचा घाट घातला आहे. 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्टमध्ये काश्मीर प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात येईल. या स्पर्धेत बाघ स्टॅलियन्स, मिरपूर रॉयल्स, मुझफ्फराबाद टायगर्स, ओवरसीज वॉरियर, कोतली लायन्स आणि रावळकोट हॉक्स या सहा टीम सहभागी होणार आहेत. या टीममधून काही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूही खेळणार आहेत. तिलकरत्ने दिलशान, मॅट प्रायर, मॉन्टी पनेसार हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले खेळाडू या लीगमध्ये दिसतील. याशिवाय शादाब खान, शान मसूद, इफ्तिकार अहमद बाग, स्टॅलियन्सकडून, ओवेस शाह, शरजील खान, खुशदिल शाह आण मोहम्मद इरफान शोएब मलिकच्या नेतृत्वात मिरपूरकडून खेळतील. पाकिस्तानला सतावतीये दोन वेळच्या अन्नाची चिंता; इम्रान खान यांनी व्यक्त केली भीती याशिवाय मोहम्मद हफीज, सोहेल तनवीर, शोएब मकसूद, तिलकरत्ने दिलशान मुझफ्फराबाद टायगर्सकडून दिसतील. कोताली लायन्सचं नेतृत्व फखर जमानला देण्यात आलं आहे. या टीममध्ये मॉन्टी पनेसार, कामरान अकमल, आसीफ अली, उस्मान कादीर खेळतील. इंग्लंडचा माजी विकेट कीपर मॅट प्रायर शाहीद आफ्रिदीच्या नेतृत्वातल्या रावळकोट टीममध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकटपटू हर्षल गिब्ज ओवरसीज वॉरियर टीममध्ये आहे. ही लीग क्रिकेटच्या काश्मीरच्या नकाशावर आणण्यासाठी आयोजित करत असल्याचं काश्मीर कमिटीचे अध्यक्ष शहरयार खान यांनी सागितलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, Pakistan

    पुढील बातम्या