नवी दिल्ली, 29 ऑगस्ट : कारगिल युध्दात भारतासाठी सीमेवर ज्यांनी शत्रुशी दोन हात केले. त्याच भारतीय लष्करातील जवानामुळं पाकिस्तानला गुडगे टेकावे लागले, आता त्याच जवानाचा मुलगा भारताचा झेंडा अटकेपार रोवण्यास सज्ज आहे. मात्र, हा मुलगा सीमेवर युध्द नाही तर क्रिकेटमध्ये भारतीय संघाला आशियाई चषकात विजय मिळून देण्यास सज्ज आहे. हा खेळाडू आहे, ध्रुव जुरेल. ध्रुव भारतीय अंडर-19 संघाकडून युवा आशियाई चषक खेळणार आहे. ध्रुवकडे भारतीय संघाचे कर्णधारपदही देण्यात आले आहे. त्यामुळं सप्टेंबरमध्ये श्रीलंकेत होणाऱ्या या स्पर्धेत विजय मिळवण्यासाठी ध्रुव सज्ज आहे. दरम्यान, ध्रुवचे वडिल 1999मध्ये झालेल्या कारगिर युध्दात लढले होते.
आग्रा येथे स्थायिक असलेला ध्रुव त्याचा विकेटकिपींगसाठी ओळखला जातो. तसेच, कठिण प्रसंगात संयमी त्याचबरोबर आक्रमक फलंदाजी करण्यातही ध्रुव तरबेज आहे. गेल्या वर्षभरात ध्रुवनं चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळं अंडर-19 युवा आशियाई चषकासाठी त्याची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. ध्रुवचा आदर्श भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी असून, माही सारखी आक्रमक फलंदाजी करण्याची त्याला विशेष रूची आहे.
वाचा-अंडर-19 संघाच्या प्रशिक्षकपदी नवी नियुक्ती, 'हे' दोन खेळाडू घेणार द्रविडची जागा
ध्रुव धोनीसारखाच विकेटकिपर-फलंदाज
18 वर्षीय ध्रुवमध्ये धोनीसारख्याच शैली आहेत. ध्रुव धोनीसारखाच विकेटकिपिंग करतो. त्याचप्रमाणे मधल्या फळीत आक्रमक फलंदाजी करण्यातही ध्रुव तरबेज आहे. इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या मालिकेत ध्रुवनं अंतिम सामन्यात अर्धशतकी खेळी करत भारताला चॅम्पियन केले होते. या सामन्यात इंग्लंडनं भारताला 262 धावांचे लक्ष्य दिले होते. यावेळी आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर ध्रुवनं मधल्या फळीत संयमी फलंदाजी केली. त्यानं 59 धावा करत सामना जिंकून दिला.
वाचा-काश्मीर मुद्द्यावर पुन्हा बरळला आफ्रिदी, एका ट्वीटने गंभीरनं केली बोलती बंद!
ध्रुवला लष्करात दाखल करण्याची होती बाबांची इच्छा
ध्रुवचे बाबा नेम सिंह जुरेल यांना त्याला लष्करात सामिल करायचे होते. शालेय शिक्षण झाल्यानंतर नॅशनल डिफेन्स अकादमीमध्ये त्यानं सामिल व्हावे अशी इच्छा त्याच्या बाबांनी व्यक्त केली होती. मात्र, ध्रुवनं क्रिकेट हे क्षेत्र निवडले. ध्रुवच्या या निर्णयावर त्याच्या बाबांनी आनंदच व्यक्त केला. कारण शेवटची ध्रुव देशासाठी काहीतरी काम करणार होता. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत नेम सिंह यांनी, “देशासाठी काहीतरी करणे महत्त्वाचे आहे. मी कारगिल युध्दाच देशासाठी काही तरी करू शकलो. माझा मुलगा क्रिकेट खेळून योगदान देत आहे. त्यामुळं क्षेत्र कोणते आहे, यापेक्षा देशासाठी योगदान देणे महत्त्वाचे आहे”, असे मत व्यक्त केले.
वाचा-जिद्दीचं दुसरं नाव मानसी जोशी! हतबल होण्याआधी 'हे' व्हिडिओ एकदा पाहाच
VIDEO: Ganesh Chaturthi 2019: दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी सूर्यमंदिराचा देखावा