Under 19 Asia Cup : वडिलांनी जिंकून दिले कारगिल युद्ध, मुलानं टीम इंडियाला केले चॅम्पियन!

Under 19 Asia Cup : वडिलांनी जिंकून दिले कारगिल युद्ध, मुलानं टीम इंडियाला केले चॅम्पियन!

ICC Under 19 Asia Cupमध्ये भारतानं सातव्यांदा आशियाई कपचा किताब मिळवला.

  • Share this:

कोलंबो, 15 सप्टेंबर : ICC Under 19 Asia Cupमध्ये भारतानं सातव्यांदा आशियाई कपचा किताब मिळवला. अटीतटीच्या या सामन्यात भारतानं अवघ्या पाच धावांमध्ये बांगलादेशला नमवले. भारतीय फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळं भारताचा संपूर्ण संघ 106 धावांचा बाद झाला. दरम्यान बांगलादेशनं 33 ओव्हरमध्ये 101 धावांतच गारद झाली. भारताकडून गोलंदाजीमध्ये अथर्व अंकोलेकरनं 22 धावा देत 5 विकेट घेतल्या. तर, आकाश सिंग 12 धावा देत 3 विकेट घेतल्या. गोलंदाजीमध्ये अथर्व अंकोलेकरनं 22 धावा देत 3 विकेट घेतल्या. तर, आकाश सिंग 12 धावा देत 3 विकेट घेतल्या.

अंडर-19 आशियाई कपच्या अंतिम सामन्यात भारतानं टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. महत्त्वाचे म्हणजे भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांनी सेमीफायनलमध्ये सामना न खेळताच फायमनमध्ये प्रवेश केला. पावसामुळं सेमीफायनलचा सामना होऊ न शकल्यामुळं लीग स्टेजमध्ये सर्व सामने जिंकत भारत आणि बांगलादेश यांनी फायनलमध्ये प्रवेश केला.

कर्णधार ध्रुव जुरेलनं सांभाळली खेळी

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचा कर्णधार ध्रुव जुरेलनं शाश्वत रावतसोबत खेळ सावरला. 8 धावात 3 विकेट गमावल्यानंतर कर्णधारानं संघाला 50चा आकडा पार करून दिला. संघ चांगल्या स्थितीत असतानाच 45 धावांची भागिदारी बांगलादेशच्या शामिम हुसैननं मोडली. 19 धावा करत शाश्वत माघारी परतला. त्यानंतर तळाच्या फलंदाजांनी भारताचा डाव सांभाळला. करण लालच्या 37 धावांच्या खेळीच्या जोरावर भारतानं 100चा आकडा गाठला आणि भारताचा डाव 33 ओव्हरमध्ये 106मध्ये आटपला.

वाचा-नवे आहेत पण छावे आहेत! पुन्हा एकदा भारत झाला आशियाई चॅम्पियन

ध्रुव धोनीसारखाच विकेटकिपर-फलंदाज

आग्रा येथे स्थायिक असलेला ध्रुव त्याचा विकेटकिपींगसाठी ओळखला जातो. तसेच, कठिण प्रसंगात संयमी त्याचबरोबर आक्रमक फलंदाजी करण्यातही ध्रुव तरबेज आहे. 18 वर्षीय ध्रुवमध्ये धोनीसारख्याच शैली आहेत. ध्रुव धोनीसारखाच विकेटकिपिंग करतो. त्याचप्रमाणे मधल्या फळीत आक्रमक फलंदाजी करण्यातही ध्रुव तरबेज आहे. इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या मालिकेत ध्रुवनं अंतिम सामन्यात अर्धशतकी खेळी करत भारताला चॅम्पियन केले होते. या सामन्यात इंग्लंडनं भारताला 262 धावांचे लक्ष्य दिले होते. यावेळी आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर ध्रुवनं मधल्या फळीत संयमी फलंदाजी केली. त्यानं 59 धावा करत सामना जिंकून दिला. अशीच काहीशी खेळी ध्रुवनं आशियाई चषकच्या अंतिम सामन्यात केली.

वाचा-मुंबईकर अथर्व अंकोलेकरची 'बेस्ट' कामगिरी! सातव्यांदा भारतानं जिंकला आशियाई कप

ध्रुवला लष्करात दाखल करण्याची होती बाबांची इच्छा

ध्रुवचे बाबा नेम सिंह जुरेल यांना त्याला लष्करात सामिल करायचे होते. शालेय शिक्षण झाल्यानंतर नॅशनल डिफेन्स अकादमीमध्ये त्यानं सामिल व्हावे अशी इच्छा त्याच्या बाबांनी व्यक्त केली होती. मात्र, ध्रुवनं क्रिकेट हे क्षेत्र निवडले. ध्रुवच्या या निर्णयावर त्याच्या बाबांनी आनंदच व्यक्त केला. कारण शेवटची ध्रुव देशासाठी काहीतरी काम करणार होता. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत नेम सिंह यांनी, “देशासाठी काहीतरी करणे महत्त्वाचे आहे. मी कारगिल युध्दाच देशासाठी काही तरी करू शकलो. माझा मुलगा क्रिकेट खेळून योगदान देत आहे. त्यामुळं क्षेत्र कोणते आहे, यापेक्षा देशासाठी योगदान देणे महत्त्वाचे आहे”, असे मत व्यक्त केले होते.

वाचा-क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ते पे सत्ता! सलग 7 चेंडूत लगावले 7 सिक्स!

'एकच साहेब पवार साहेब', मुख्यमंत्र्यांचं असं झालं बारामतीत स्वागत, संपूर्ण VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 14, 2019 10:02 PM IST

ताज्या बातम्या