असा रंगला कपिल देव विरुद्ध करिना कपूर सामना; निकाल पाहून तुम्हाला बसेल शॉक!

असा रंगला कपिल देव विरुद्ध करिना कपूर सामना; निकाल पाहून तुम्हाला बसेल शॉक!

कपिल देव आणि 1983च्या वर्ल्ड कपवर सिनेमा बनवण्यात येत आहे.

  • Share this:

मुंबई, 12 ऑगस्ट : भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठं नाव म्हणजे कपिल देव. 1983मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतानं पहिला वर्ल्ड कप जिंकला. आजही कपिल देव यांची क्रेझ कायम आहे, युवा खेळाडूंसाठी ते प्रेरणा स्थानी आहेत. दरम्यान एक रिअलिटी शोमध्ये नुकतीच कपिल देव यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांना बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर हिच्यासोबतचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या कार्यक्रमादरम्यान करिना कपूर खानही कपिल देव यांची फॅन झाली.

कपिल देव यांनी नुकतीच एका डान्स शोला भेट दिली, यावेळी करिना कपूरसोबत कपिल देव गाण्यांवर थिरकलेच नाही तर, क्रिकेटही खेळले. करिनानं कपिल यांच्या गोलंदाजीवर बॅटींग केली, त्याचबरोबर तैमुरला एक गिफ्टही दिले.

1983 वर्ल्ड कपवर येतोय सिनेमा

कपिल देव आणि 1983च्या वर्ल्ड कपवर सिनेमा बनवण्यात येत आहे. अभिनेता रनवीर सिंह या सिनेमात कपिल देवची भुमिका साकारणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कपिल देव डान्स इंडिया डान्स या शोमध्ये सामिल झाले होते. हा सिनेमा 5 एप्रिल 2019मध्ये रिलीज होणार असून कबीर खान यानं सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

वाचा-...म्हणून विराटनं ठरला मैदानात ठेका!

करिना कपूरसोबर खेळला क्रिकेट

या कार्यक्रमादरम्यान कपिल देव आणि करिना कपूर यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी करिनानं तैमुरसाठी कपिल देव यांच्याकडू त्यांची सही असलेली बॅट मागितली. कपिल देव यांनी दिलेले गिफ्ट पाहून करिना खुश झाली. यावेळी करिनानं, “मला आतून असं वाटतं की माझ्या मुलानं क्रिकेटर बनावं”, अशी इच्छा बोलून दाखवली.

वाचा-लग्नाआधी बहिणीनं शोधली दीपक चहरची मुलगी! VIDEO VIRAL

मराठवाड्यासाठी खूशखबर, 'जायकवाडी'ची दारं उघडणार? या आहे टॉप 18 बातम्या

Published by: Akshay Shitole
First published: August 12, 2019, 7:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading