Home /News /sport /

‘प्रिन्स ऑफ कोलकाता’वर येणार Biopic! शाहरूख, सलमान नाही तर हा अभिनेता आहे गांगुलीची पहिली पसंत

‘प्रिन्स ऑफ कोलकाता’वर येणार Biopic! शाहरूख, सलमान नाही तर हा अभिनेता आहे गांगुलीची पहिली पसंत

२००३-०४ च्या दौऱ्यात पहिल्यांदा टीम इंडिया मालिका जिंकण्याच्या अगदी जवळ होती. पहिला सामना अनिर्णित राहिल्यानंतर राहुल द्रविडच्या अफलातून फलंदाजीमुळे भारताने दुसरा सामना जिंकला. मात्र तिसऱ्या सामन्यात पराभव आणि चौथा सामना अनिर्णित राहिल्यामुळे सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाचं मालिका जिंकण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं.

२००३-०४ च्या दौऱ्यात पहिल्यांदा टीम इंडिया मालिका जिंकण्याच्या अगदी जवळ होती. पहिला सामना अनिर्णित राहिल्यानंतर राहुल द्रविडच्या अफलातून फलंदाजीमुळे भारताने दुसरा सामना जिंकला. मात्र तिसऱ्या सामन्यात पराभव आणि चौथा सामना अनिर्णित राहिल्यामुळे सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाचं मालिका जिंकण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं.

बॉलीवूडमध्ये सध्या बायोपीकचा ट्रेंड सुरू झाला आहे. यआधी अनेक खेळाडूंवर बायोपिक्स बनविल्या गेल्या आहेत आणि त्या यशस्वीही झाल्या आहेत.

    कोलकाता, 25 फेब्रुवारी : बॉलीवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेंड सुरू झाला आहे. यआधी अनेक खेळाडूंवर बायोपिक्स बनविल्या गेल्या आहेत आणि त्या यशस्वीही झाल्या आहेत. मोहम्मद अझरुद्दीन, एमसी मेरी कोम, महेंद्रसिंग धोनी आणि संदीप सिंग यांच्यावर बायोपिक तयार करण्यात आली आहे. आता यात आणखी एक क्रिकेटपटूचे नाव सामिल होणार आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीनंतर आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीवर बायोपीक येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सिनेमासाठी गांगुली आणि करण जोहर यांनी भेटही घेतली आहे. वाचा-धवन म्हणाला 'गब्बर इज बॅक'! फिल्मी स्टाईल फोटो शेअर करत केली कमबॅकची घोषणा काही दिवसांपूर्वी सौरव गांगुलीच्या जीवनावर एकता कपूर सिनेमा तयार करणार असल्याच्या बातम्या होत्या. आता करण जोहर हा सिनेमा करत असल्याचे समोर आले आहे. क्रिकेट विश्वात सौरव गांगुलीला 'दादा' म्हणून ओळखले जाते, त्यामुळे या चित्रपटाला 'दादागिरी' असे नाव दिले जाऊ शकते. सौरव गांगुली यांनी याबाबत सांगताता, मी एकता कपूर यांना काही दिवसांपूर्वी भेटलो होतो, पण हे प्रकरण पुढे गेले नाही. हे खरं आहे की सध्या कित्येक बायोपिक खेळाडूंवर तयार केल्या जात आहेत. मला आशा आहे की माझी बायोपिक बनल्यास प्रेक्षकांनाही आवडेल. वाचा-VIDEO: ट्रम्प यांची भविष्यवाणी! IPL 2020 जिंकणाऱ्या संघाचे सांगितले नाव? गांगुलीला हृतिक रोशन हवा मुख्य भूमिकेत काही दिवसांपूर्वी, एका टॉक शो दरम्यान जेव्हा सौरव गांगुलीला विचारले होते की बायोपिकमध्ये कोणत्या अभिनेत्यानं त्याची भूमिका साकारावी? यावर गांगुलीने हृतिक रोशनचे नाव घेतले होते. हृतिक रोशनला सौरव गांगुली खूप आवडतो. त्यामुळं हृतिकनेही ही भूमिका करण्यासाठी उत्सुकता व्यक्त केली होती. अद्याप याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. वाचा-केएल राहुलला मिळाली संघात जागा, मालिका जिंकण्यासाठी घेतला मोठा निर्णय वाचा-हे 5 दिग्गज फलंदाज आहेत IPLचे रनमशीन! आजही गोलंदाजांना भरते धडकी असे आहे गांगुलीचे करिअर सौरव गांगुलीने आपल्या 12 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये 113 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्यानं 42.17च्या सरसरीनं 7212 धावा केल्या आहेत. यात त्यानं 6 शतक आणि 35 अर्धशतकं लगावली आहेत. एवढेच नाही तर 32 विकेटही घेतल्या आहेत. तर, 311 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात 41.02च्या सरासरीनं 11 हजार 363 धावा केल्या आहेत. 100 विकेटही घेतल्या आहेत. सौरव गांगुलीची ओळख अत्यंत आक्रमक कर्णधार म्हणून होती. भारतीय संघाला ‘टीम इंडिया’ बनविण्याचे श्रेय गांगुलीला जाते क्रिकेटमधून निवृत्तीनंतर ते प्रशासनात रुजू झाला आणि सध्या बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Hritik Roshan, Karan Johar, Sourav ganguly

    पुढील बातम्या