अँजिओप्लास्टीनंतर अशी आहे कपिल देव यांची प्रकृती, रुग्णालयातून समोर आला पहिला PHOTO

अँजिओप्लास्टीनंतर अशी आहे कपिल देव यांची प्रकृती, रुग्णालयातून समोर आला पहिला PHOTO

कपिल देव यांची प्रकृती स्थिर असून दोन दिवसांत त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळण्याची अपेक्षा आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर : भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणारे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. शुक्रवारी रात्री उशिरा कपिल देव यांच्या छातीत दुखायला लागलं. यानंतर त्यांना दिल्लीच्या एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. क्रिकेटर चेतन शर्मा यांनी कपिल देव यांचा एक फोटो शेअर केला आहे.

कपिल देव यांनी ट्वीट करत, प्रकृती ठीक असून. रिकव्हरी प्रक्रिया सुरू झाली असल्याचे सांगितले. दरम्यान, रुग्णालयाने आपल्या सुरुवातीच्या हेल्थ बुलेटिनमध्ये छातीत दुखण्याचा उल्लेख केला होता, त्यानंतर ताज्या आरोग्य बुलेटिनमध्ये, “कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला. त्याची तपासणी केली गेली आणि रात्री तातडीने अँजिओप्लास्टी केली गेली"ö असे सांगितले. दरम्यान आता, त्यांची प्रकृती स्थिर असून दोन दिवसांत त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान चेतन शर्मा यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये कपिल देव मुलगी अमायासोबत दिसत आहे.

याआधी कपिल देव यांनी ट्वीट करून सर्वांचे आभार मानले आणि रिकव्हरी प्रकिया सुरू झाली असून लवकरच बरा होईल असे सांगितले.

तर, कपिल देव यांच्या तब्येतीसाठी सगळेच जण प्रार्थना करत आहेत. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, सुरेश रैना, शिखर धवन यांनीही कपिल देव यांना लवकर बरं वाटावं, अशी प्रार्थना केली आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: October 24, 2020, 12:32 PM IST
Tags:

ताज्या बातम्या