Tiger is Back: अँजिओप्लास्टीनंतर कपिल देव यांनी शेअर केला भावूक करणारा VIDEO

कपिल देव यांनी ट्वीट करत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.

कपिल देव यांनी ट्वीट करत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.

  • Share this:
    नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार, वर्ल्ड कप विजेते कपिल देव (Kapil Dev) यांनी अँजिओप्लास्टीनंतर एक व्हिडीओ शेअर केला आहे. कपिल देव यांनी ट्वीट करत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. याआधी कपिल देव यांनी गोल्फ खेळतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कपिल देव यांनी गोल्फ खेळण्यास सुरुवात केली होती. 61 वर्षीय ज्येष्ठ अष्टपैलू कपिल देव यांनी डॉक्टरांकडून परवानगी मिळाल्यानंतर लवकरच गोल्फ खेळायला आवडेल असे सांगितले होते आणि गुरुवारी ते दिल्लीतील गोल्फ क्लबमध्ये खेळताना दिसले. काही आठवड्यांपूर्वी कपिल देव यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी कपिल देव यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. 1994 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिल्यापासून कपिल यांनी गोल्फ खेळण्यास सुरुवात केली. याचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला होता.
    Published by:Priyanka Gawde
    First published: