• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • 'ते पाहून हैराण होतो', कपिल देव यांचा नव्या फास्ट बॉलरवर निशाणा

'ते पाहून हैराण होतो', कपिल देव यांचा नव्या फास्ट बॉलरवर निशाणा

महान ऑलराऊंडर कपिल देव (Kapil Dev) यांनी सध्याच्या बॉलर्सच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आताचे बॉलर काही ओव्हर टाकल्यानंतरच थकून जातात, हे पाहून मी हैराण होतो, असं कपिल देव म्हणाले आहेत.

 • Share this:
  मुंबई, 28 जून : महान ऑलराऊंडर कपिल देव (Kapil Dev) यांनी सध्याच्या बॉलर्सच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आताचे बॉलर काही ओव्हर टाकल्यानंतरच थकून जातात, हे पाहून मी हैराण होतो, असं कपिल देव म्हणाले आहेत. मी नेटमध्ये टेल एंडर्सनाच अनेक ओव्हर टाकायचो, पण सध्याचे बॉलर 4 ओव्हरच टाकू शकतात, अशी प्रतिक्रिया कपिल देव यांनी दिली. 'जेव्हा तुम्ही वर्षातले 10 महिने क्रिकेट खेळलात तर दुखापतीचा धोका वाढतो. हल्ली क्रिकेटपटू फक्त बॉलिंग करतात किंवा फक्त बॅटिंग, आमच्यावेळी मात्र खेळाडूला सगळं काही करावं लागायचं. आता क्रिकेट थोडं बदललं आहे. एखाद्या बॉलरला 4 ओव्हर टाकल्यानंतर थकलेलं पाहिलं की दु:ख होतं. नेटमध्ये त्यांना 3-4 ओव्हर टाकायची परवानगी नाही, असं काही जण म्हणतात. आम्ही तर टेल एंडर्सनाच 10-10 ओव्हर टाकायचो. हे योग्य आहे का नाही मला माहिती नाही, पण आपली मानसिकता अशी असली पाहिजे, त्यामुळे फिटनेस कायम राहतो,' असं वक्तव्य कपिल देव यांनी केलं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडने टीम इंडियाचा (India vs New Zealand) 8 विकेटने पराभव केला. या सामन्यात भारताने 5 बॉलरना संधी दिली होती, यात जडेजा (Ravindra Jadeja) आणि अश्विन (R Ashwin) स्पिन बॉलर तर मोहम्मद शमी (Mohammad Shami), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि इशांत शर्मा (Ishant Sharma) हे तिघं फास्ट बॉलर होते. दुसरीकडे किवी टीमचा कर्णधार केन विलियमसनने (Kane Williamson) 5 फास्ट बॉलर खेळवले होते, यात कॉलिन डी ग्रॅण्डहोम आणि काईल जेमिसन (Kyle Jamieson) या दोन फास्ट बॉलिंग ऑलराऊंडरचा समावेश होता. जेमिसनने पहिल्या इनिंगमध्ये 5 विकेट घेतल्या तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने भारताच्या महत्त्वाच्या बॅट्समनना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. भारताचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहला मात्र एकही विकेट मिळाली नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) टीममध्ये फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर नसल्यामुळे संतुलन बिघडत असल्याची खंत बोलून दाखवली. आता भारतीय टीम इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये मैदानात उतरणार आहे, तेव्हा विराट कोणाला संधी देतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
  Published by:Shreyas
  First published: