मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'83' साठी कपिल देव यांनी किती पैसे घेतले? ऐकून बसेल धक्का

'83' साठी कपिल देव यांनी किती पैसे घेतले? ऐकून बसेल धक्का

रणवीर सिंग (Ranveer Singh) याचा 83 हा चित्रपट 24 डिसेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग भारताचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांची भूमिका साकारत आहे.

  • Published by:  Shreyas
मुंबई, 22 डिसेंबर : रणवीर सिंग (Ranveer Singh) याचा 83 हा चित्रपट 24 डिसेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग भारताचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांची भूमिका साकारत आहे. 1983 साली भारताने पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता. या वर्ल्ड कपमधल्या टीम इंडियाच्या कामगिरीवर हा चित्रपट आहे. 1983 वर्ल्ड कपच्या (World Cup 1983) कफायनलमध्ये भारताने वेस्ट इंडिजचा पराभव केला होता. कबीर खानच्या दिग्दर्शनातला हा चित्रपट भारताच्या ऐतिहासिक विजयावर आधारित आहे. या चित्रपटात सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांची भूमिका ताहीर राज भसीन, यशपाल शर्मा यांची भूमिका जतिन सरना, मोहिंदर अमरनाथचा रोल साकीब सलीम, रवी शास्त्रींचा रोल धैर्य करवा, के श्रीकांत यांचा रोल जीवा, मदन लाल यांचा रोल हार्डी संधू, बलविंदर सिंग यांचा रोल एमी विर्क, सैय्यद किरमाणी यांचा रोल साहिल खट्टर, संदीप पाटीलचा रोल चिराग पाटील, दिलीप वैंगसरकरचा रोल आदिनाथ कोठारे, किर्ती आझाद यांचा रोल दिनकर शर्मा, रॉजर बिन्नी यांचा रोल निशांत दहिया करत आहेत. याशिवाय पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) टीम मॅनेजर पीआर मान सिंग यांच्या भूमिकेत दिसतील. 83 चित्रपटाच्या रिलीजआधी निर्मात्यांनी भारतीय खेळाडूंना 15 कोटी रुपये दिले आहेत. Bollywood Hungama.com च्या रिपोर्टनुसार कपिल देव यांनी आपली कहाणी सांगायला 5 कोटी रुपयांचं मानधन घेतलं. सूत्राने बॉलिवूड हंगामाला सांगितलं की, 'चित्रपट बनवण्याआधी विषयाचे अधिकार आणि खेळाडूंच्या वैयक्तिक कहाण्या मिळवणं गरजेचं होतं. जेव्हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. त्यामुळे निर्मात्यांनी 1983 वर्ल्ड कप विजेत्या टीमला 15 कोटी रुपये दिले. यातली सर्वाधिक रक्कम कपिल देव यांना मिळाली आहे.' चित्रपट रिलीज होण्याआधीच चर्चेत आहे. एका आठवड्याआधी दुबईच्या बुर्ज खलिफामध्ये 83 चित्रपटाचा ट्रेलर दाखवण्यात आला. यावेळी रणवीर, दीपिका पादुकोण आणि कबीर खान तिकडे उपस्थित होते. चित्रपटाचा प्रीमियर रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये करण्यात आला. प्रीमियरला रणवीरशिवाय दीपिका, दिग्दर्शक कबीर खान त्याची पत्नी मिनी माथूर, कपिल देव आणि त्यांची पत्नी रोमी उपस्थित होते.
First published:

Tags: Ranveer singh, Team india

पुढील बातम्या