भारतीय संघाचा कोच निवडण्यासाठी 'या' दिग्गजांची टीम सज्ज!

सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही व्ही एस लक्ष्मण यांची सल्लागार समिती BCCIने बरखास्त केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 28, 2019 08:46 AM IST

भारतीय संघाचा कोच निवडण्यासाठी 'या' दिग्गजांची टीम सज्ज!

ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघाला अपयश मिळाल्यानंतर BCCIने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफसाठी नव्याने अर्ज मागवले. त्यामुळं लवकरच प्रशिक्षक रवी शास्त्री यांना नारळ मिळणार आहे.

ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघाला अपयश मिळाल्यानंतर BCCIने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफसाठी नव्याने अर्ज मागवले. त्यामुळं लवकरच प्रशिक्षक रवी शास्त्री यांना नारळ मिळणार आहे.

दरम्यान प्रशिक्षकासाठी बीसीसीआयनं अर्ज करणाऱ्यांचे वय हे 60 पेक्षा कमी असावे आणि त्या उमेदवाराला किमान 2 वर्षांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव अशी अट ठेवण्यात आली आहे.

दरम्यान प्रशिक्षकासाठी बीसीसीआयनं अर्ज करणाऱ्यांचे वय हे 60 पेक्षा कमी असावे आणि त्या उमेदवाराला किमान 2 वर्षांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव अशी अट ठेवण्यात आली आहे.

बीसीसीआय प्रमुख विनोद राय यांनी पुरुष संघासाठी तीन सदस्यांची समित गठित करण्यात आली आहे, अशी घोषणा केली. तसेच, ऑगस्टपासून भारतीय संघाच्या प्रशिक्षकांसाठी मुलाखतींना सुरुवात होणार आहे.

बीसीसीआय प्रमुख विनोद राय यांनी पुरुष संघासाठी तीन सदस्यांची समित गठित करण्यात आली आहे, अशी घोषणा केली. तसेच, ऑगस्टपासून भारतीय संघाच्या प्रशिक्षकांसाठी मुलाखतींना सुरुवात होणार आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने प्रशिक्षकाच्या निवडीसाठी तीन सदस्यीय क्रिकेट सल्लागार समिती नेमली आहे. या समितीचे अध्यक्षपद माजी कर्णधार कपिल देव यांच्याकडे असणार आहे. तर, अंशुमन गायकवाड व शांथा रंगास्वामी हे देखील या समितीचे सदस्य आहेत.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने प्रशिक्षकाच्या निवडीसाठी तीन सदस्यीय क्रिकेट सल्लागार समिती नेमली आहे. या समितीचे अध्यक्षपद माजी कर्णधार कपिल देव यांच्याकडे असणार आहे. तर, अंशुमन गायकवाड आणि शांथा रंगास्वामी हे देखील या समितीचे सदस्य आहेत.

अंशुमन गायकवाड हे भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक असून, त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना रवी शास्त्री यांनाच प्रशिक्षक म्हणून घोषित केले जाणार असल्याचे संकेत दिले. मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.

Loading...

याआधी BCCI ने सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही व्ही एस लक्ष्मण यांची सल्लागार समिती नेमली होती, पण ही समिती बरखास्त करण्यात आली आहे.

याआधी BCCI ने सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांची सल्लागार समिती नेमली होती, पण ही समिती बरखास्त करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2019 08:46 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...