...म्हणून रवी शास्त्री पुन्हा झाले टीम इंडियाचे कोच!

कपिल देव यांनी रवी शास्त्री हे 2021 टी-20 वर्ल्ड कपपर्यंत भारतीय संघाचे प्रशिक्षक असतील अशी घोषणा केली.

  • Share this:

कपिल देव यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या प्रशासकिय समितीनं पुन्हा एकदा रवी शास्त्री यांची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली आहे.

वर्ल्ड कपमध्ये भारताच्या पराभवानंतर  बीसीसीआयनं मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्फाटसाठी अर्ज मागवले होते. दरम्यान, रवी शास्त्रींसह रॉबीन सिंग, लालचंद राजपूत, माईक हेसन, टॉम मूडी यांनी अर्ज केले होते.

कपिल देव यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत रवी शास्त्री हे 2021 टी-20 वर्ल्ड कपपर्यंत भारतीय संघाचे प्रशिक्षक असतील अशी घोषणा केली.

रवी शास्त्री यांची निवड केल्यानंतर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र कपिल देव यांना आधीपासून भारतीय प्रशिक्षक हवा होता, त्यामुळं त्यांनी शास्त्री यांची निवड केली असावी.

त्याबरोबर कर्णधार विराट कोहलीसह संघातील खेळाडूदेखील शास्त्री प्रशिक्षक व्हावं या मताचे आहेत.

विंडीज दौऱ्यावर जाण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीनं सांगितंल होतं की, पुन्हा एकदा शास्त्री प्रशिक्षक झाल्यास आनंद होईल.

पुढच्या दोन वर्षात भारतीय संघाला आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप आणि टी20 वर्ल्ड कप खेळायचा आहे. त्यामुळं नवीन कोच संघाचे समीकरण बदलू शकतात. तसेच, शास्त्री आणि कोहली दोघंही एकमेकांना पुरक आहेत, म्हणून शास्त्रींचे पद कायम ठेवले असावे.

शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारतानं 21 कसोटी सामने खेळले त्यातील 13 सामन्यात विजय मिळवला. तर, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 36 सामन्यांपैकी 25 सामन्यात विजय मिळवला.

मात्र रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली आशियाई चषक वगळता भारताला एकही मोठी स्पर्धा जिंकता आलेली नाही. वर्ल्ड कपमध्येही सेमीफायनलमध्ये भारताचा मानहानीकारक पराभव झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 16, 2019 07:09 PM IST

ताज्या बातम्या