रवी शास्त्रींना दिलासा, कपिल देव समितीनं घेतला 'हा' मोठा निर्णय!

Team India Coach : वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारतीय संघाला नवा प्रशिक्षक मिळण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 6, 2019 05:46 PM IST

रवी शास्त्रींना दिलासा, कपिल देव समितीनं घेतला 'हा' मोठा निर्णय!

मुंबई, 06 ऑगस्ट : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ विंडीज दौऱ्यानंतर संपणार आहे. त्यानंतर भारताला नवा प्रशिक्षक मिळण्याची शक्यता आहे. माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या अध्यक्षतेखाली क्रिकेट सल्लागार समिती प्रशिक्षकाची निवड करणार आहे. यासंदर्भात आता मोठी बातमी म्हणजे भारतीय संघाला विदेशी प्रशिक्षक मिळणार नाही आहे.

भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदासाठी बीसीसीआयच्या वतीनं अर्ज मागवण्यात आले होते. त्यानंतर कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समिती अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची मुलाखत घेणार आहे. क्रिकेट सल्लागार समितीमध्ये कपिल देव यांच्याशिवाय माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड आणि माजी महिला क्रिकेटपटू शांता गंतास्वामी आहेत. मात्र आता कपिल देव यांच्या समितीनं विदेशी कोचची निवड करणार नसल्याचे सांगितले जात आहे.

शास्त्रींच्या कामावर संतुष्ट आहे समिती

दरम्यान कपिल देव यांच्या समितीनं प्रशिक्षकांच्या पदाचे अर्ज पडताळण्यास सुरुवात केली. त्यानुसार सुत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ही समिती रवी शास्त्री यांच्या कामावर खुश आहे. त्यामुळं प्रशिक्षक म्हणून पुन्हा शास्त्री यांची नियुक्ती होऊ शकते. तसेच, 15 ऑगस्टच्या आसपास टीम इंडियाला नवा प्रशिक्षक मिळू शकतो.

वाचा-टीम इंडियाच्या प्रशिक्षकाची निवड सर्वांच्या सहमतीनं नाही, COAनं केला 'हा' खुलासा

Loading...

हे विदेशी प्रशिक्षक होते शर्यतीत

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू खेळाडू टॉम मूडी हे आहेत. त्यांनी 2007 च्या वर्ल्ड कपमध्ये लंकेला अंतिम फेरीत पोहचवलं होतं. त्यानंतर 2012 पासून टॉम मूडी आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचे प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत. तसेच, न्यूझीलंडचा माजी प्रशिक्षक माईक हेसनही याने अर्ज दाखल केला होता. 2015च्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडला अंतिम सामन्यात पोहचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत कोचिंग स्टाफचा कार्य़काळ

सध्या कार्यरत असलेल्या भारताच्या कोचिंग स्टाफचा कार्य़काळ हा वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत म्हणजेच 45 दिवस वाढवण्यात आला आहे. यात मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरूण, फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांचा समावेश आहे.

वाचा-तारीख ठरली! वेस्ट इंडिज दौऱ्यातच टीम इंडियाला मिळणार नवा कोच

बीसीसीआयच्या निवडणूकांआधी होणार निर्णय

22 ऑक्टोबर रोजी बीसीसीआयच्या निवडणूका होणार आहेत.या 26 राज्य लोढाच्या नियमांचे पालन करत आहेत. त्यामुळं प्रत्येक राज्यात एक अधिकारी तैनात केला जाणार आहे. या सगळ्याचा विचार करता ऑगस्टमध्येच टीम इंडियाच्या प्रशिक्षकाचा प्रश्न मार्गी लावला जाऊ शकतो.

वाचा-शाहरूखला मोठा झटका, 'या' दोन मुख्य खेळाडूंनी सोडली KKRची साथ!

VIDEO : पंतप्रधान मोदींना भारतरत्न देण्याची मागणी; यासह पाहा 4 वाजताच्या टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 6, 2019 05:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...