• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • कपिल देव दिसले रणवीर सिंगच्या स्टाईलमध्ये, सोशल मीडियावर Memes चा धुमाकूळ

कपिल देव दिसले रणवीर सिंगच्या स्टाईलमध्ये, सोशल मीडियावर Memes चा धुमाकूळ

राहुल द्रविडची इंदिरा नगर का गुंडा ही जाहिरात लोकप्रिय झाल्यानंतर आता क्रेडची नवी जाहिरातही चर्चेचा विषय ठरत आहे. या नव्या जाहिरातीमध्ये महान क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev) बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंग (Ranveer Singh) याची स्टाईल मारताना दिसत आहेत.

 • Share this:
  मुंबई, 18 ऑक्टोबर : राहुल द्रविडची इंदिरा नगर का गुंडा ही जाहिरात लोकप्रिय झाल्यानंतर आता क्रेडची नवी जाहिरातही चर्चेचा विषय ठरत आहे. या नव्या जाहिरातीमध्ये महान क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev) बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंग (Ranveer Singh) याची स्टाईल मारताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये कपिल देव यांनी रणवीर सिंग याच्यासारखे रंगीबेरंगी कपडे घातले आहेत. कपिल देव यांचं हे नवीन रूप पाहून याचे वेगवेगळे मीम्सही बनवण्यात आले आहेत. 83 या चित्रपटामध्ये रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका निभावत आहे, त्याचप्रमाणे या जाहिरातीमध्ये कपिल देव रणवीरच्या भूमिकेत दिसत आहेत. 1983 वर्ल्ड कपवर आधारित 83 हा चित्रपट कबीर खान यांनी दिग्दर्शित केला आहे. कपिल देव आणि भारतीय क्रिकेट टीमचा संघर्षमय प्रवास आणि 1983 वर्ल्ड कप विजय यावर हा चित्रपट असणार आहे. कपिल देव यांच्या रुपात दिसणाऱ्या रणवीर सिंगचे अनेक फोटो याआधी समोर आले आहेत. क्रेडच्या जाहिरातीमधले कपिल देव यांचे रंगीबेरंगी कपडे बघून चाहत्यांनीही बऱ्याच मीम्स व्हायरल केल्या. अनेकांनी तर आता कपिल देव यांनी रणवीर सिंगच्या बायोपिकमध्ये काम करावं, अशी मागणी केली. 83 या चित्रपटामध्ये सुनिल गावसकर यांची भूमिका ताहिर राज भसीन, मोहिंदर अमरनाथ यांची भूमिका साकिब सलीम, बलविंदर संधूंची भमिका एम्मी विर्क, सैय्यद किरमाणींच्या भूमिकेत साहिल खट्टर, संदीप पाटील यांच्या भूमिकेत चिराग पाटील, दिलीप वैंगसकरांच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे, रवी शास्त्रींच्या भूमिकेत धैर्य करवा, कीर्ती आझाद यांच्या भूमिकेत दिनकर शर्मा, यशपाल शर्मांच्या भूमिकेत जतिन सरना, मदनलाल यांच्या भूमिकेत हार्डी संधू, रॉजर बिन्नीच्या भूमिकेत निशांत दहिया, सुनिल वालसन यांच्या भूमिकेत आर बद्री आणि कोच पीआर मान सिंग यांच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी दिसणार आहेत. रणवीर सिंगची पत्नी दीपिका पदुकोण चित्रपटात कपिल देव यांची पत्नी रोमी देव यांची भूमिका साकारणार आहे. कोरोना महामारीमुळे 83 चित्रपटाचं प्रदर्शन अनेकवेळा पुढे ढकललं गेलं. मल्टीप्लेक्स आणि थिएटर्स बंद असल्यामुळे हा चित्रपट थेट ओटीटीवर रिलीज होईल, असंही बोललं जात होतं. महाराष्ट्र सरकारने जेव्हा मल्टीप्लेक्स आणि थिएटर्स उघडण्याची परवानगी दिली तेव्हा 24 डिसेंबरला चित्रपट रिलीज होईल, असं निर्मात्यांनी सांगितलं.
  Published by:Shreyas
  First published: