• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • कपिल देवनी बनवलं विराट-शास्त्रींचं रिपोर्ट कार्ड, सांगितली सगळ्यात मोठी 'कमजोरी'

कपिल देवनी बनवलं विराट-शास्त्रींचं रिपोर्ट कार्ड, सांगितली सगळ्यात मोठी 'कमजोरी'

टी-20 वर्ल्ड कपमधल्या (T20 World Cup) निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय क्रिकेटमधून विराट कोहली-रवी शास्त्री (Virat Kohli Ravi Shastri) युगाचा अंत झाला. भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev) यांनी शास्त्री आणि कोहली यांच्या कामगिरीचं रिपोर्ट कार्ड दिलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 17 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमधल्या (T20 World Cup) निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय क्रिकेटमधून विराट कोहली-रवी शास्त्री (Virat Kohli Ravi Shastri) युगाचा अंत झाला. शास्त्रींऐवजी राहुल द्रविड (Rahul Dravid) टीमचा मुख्य प्रशिक्षक झाला आहे, तर टी-20 मध्ये विराटने कॅप्टन्सी सोडली आहे. विराटऐवजी रोहित शर्माकडे (Rohit Sharma) टीम इंडियाचं नेतृत्व देण्यात आलं आहे. कोहली आणि शास्त्री यांची जोडी 2017 साली भारतीय क्रिकेटमध्ये एकत्र आली. या चार वर्षांच्या काळात टीम इंडियाने ऐतिहासिक कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिजमध्ये दोनदा पराभव केला, तर इंग्लंडमधल्या टेस्ट सीरिजमध्ये आघाडी घेतली. कोहली आणि शास्त्री यांच्या जोडीला परदेशामध्ये यश मिळालं असलं, तरी भारताला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. रवी शास्त्री आणि विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने 2019 वनडे वर्ल्ड कप, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आणि टी-20 वर्ल्ड कप खेळला, पण एकदाही त्यांना ट्रॉफी जिंकता आली नाही. भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev) यांनी शास्त्री आणि कोहली यांच्या कामगिरीचं रिपोर्ट कार्ड दिलं आहे. 'भारतीय टीमची कामगिरी चांगली झाली असली, तरी आयसीसी ट्रॉफी नसल्यामुळे दोघांचं करियर अधुरं राहिलं. 2007 वनडे वर्ल्ड कपनंतर भारताची टी-20 वर्ल्ड कपमधली ही खराब कामगिरी होती,' असं कपिल देव यांना वाटतं. अनकटला दिलेल्या मुलाखतीमध्ये कपिल देव म्हणाले, 'मला वाटतं दोघांनी चांगलं काम केलं. भारताला मोठी ट्रॉफी जिंकता आली नाही, पण मागच्या पाच वर्षांमध्ये काहीही कमी राहिली नाही. आयसीसी ट्रॉफी जिंकणं सगळ्यात मोठी कमी आहे, पण भारताने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये विजय मिळवला. भारताने ज्या देशाचा दौरा केला, त्यांना पराभूत केलं. वेस्ट इंडिजमध्ये 2007 साली झालेल्या वनडे वर्ल्ड कपनंतर टी-20 वर्ल्ड कपमधली भारताची ही निराशाजनक कामगिरी होती. जर ते सेमी फायनलला पोहोचून पराभूत झाले, असते तर मी मसजू शकलो असतो. तुम्ही टॉप-4 मध्ये येत नसाल तर तुमच्यावर टीका होणारच आहे.' कपिल देव यांनी विराट-शास्त्री यांना 100 पैकी 90 मार्क दिले. आयसीसी ट्रॉफी न जिंकल्यामुळे त्यांनी दोघांना 10 मार्क कमी दिले.
  Published by:Shreyas
  First published: