मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Happy Birthday Kapil Dev : सुरुवातीला सर्वांनी वेड्यात काढलं पण नंतर याच वेड्याने इतिहास घडवला

Happy Birthday Kapil Dev : सुरुवातीला सर्वांनी वेड्यात काढलं पण नंतर याच वेड्याने इतिहास घडवला

18 जून 1983 ला इंग्लंडमधील टनब्रिल वेल्स येथे झालेल्या झिम्बॉम्बेविरुद्धच्या सामन्यात कपिल देव फलंदाजीला मैदानात उतरले तेव्हा भारताच्या 4 बाद 9 धावा झाल्या होत्या.

18 जून 1983 ला इंग्लंडमधील टनब्रिल वेल्स येथे झालेल्या झिम्बॉम्बेविरुद्धच्या सामन्यात कपिल देव फलंदाजीला मैदानात उतरले तेव्हा भारताच्या 4 बाद 9 धावा झाल्या होत्या.

भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या माजी कर्णधार कपिल देव यांचा आज वाढदिवस. आपण वर्ल्ड कप जिंकू शकतो असं जेव्हा ते म्हणाले होते तेव्हा सहकारी खेळाडूच त्यांना वेड लागलंय असं म्हणाले होते.

  • Published by:  Suraj Yadav

मुंबई, 06 जानेवारी : भारताने पहिला वर्ल्ड कप जिंकला ती गोष्ट जगासाठीच नाही तर भारताला सुद्धा स्वप्नवत अशीच होती. 1983 मध्ये भारतीयांना आपण वर्ल्ड कप जिंकू असं वाटत नव्हतं. फायनलमध्ये तेव्हा सलग दोन वर्ल्ड कप जिंकलेल्या वेस्ट इंडिजचे आव्हान भारतीय खेळाडूंसमोर होतं. त्यावेळी वेस्ट इंडिजच्या माऱ्यासमोर टिकून राहणं फलंदाजांना कठीण होतं. अशा परिस्थितीत भारताने जिंकलेल्या वर्ल्ड कपचा आनंद वेगळाच होता. तेव्हा संघाला आत्मविश्वास दिला तो कर्णधार कपिल देव यांनी.  भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या या कर्णधाराचा आज वाढदिवस. कपिल देव यांनी जेव्हा आपण वर्ल्ड कप जिंकू शकतो असं म्हटलं होतं तेव्हा त्यांना वेड लागलंय असंच सहकारी म्हटले पण याच वेड्याने इतिहास घडवत भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला.

लॉर्ड्सवर झालेल्या अंतिम सामन्यात बलाढ्य वेस्ट इंडिजला पराभूत करून भारताने पहिला वर्ल्ड कप जिंकला होता. त्याच्या आठवणी सांगताना के श्रीकांत यांनी म्हटलं होतं की, जेव्हा आम्ही स्पर्धेसाठी इंग्लंडला रवाना झालो तेव्हासुद्धा जग्गजेते होऊ असं वाटत नव्हतं.

भारताला वर्ल्ड कप जिंकण्याची आशा नव्हती कारण पहिल्या दोन वर्ल्ड कपमध्ये फक्त आफ्रिकेला पराभूत करता आलं होतं. तर ज्या संघाला कसोटी संघाचा दर्जा नव्हता त्या श्रीलंकेकडून पराभूत होण्याची वेळ आली होती. मात्र, कपिल देव यांनी संघात आत्मविश्वास निर्माण केला असं के श्रीकांत यांनी सांगितलं होतं.

वाचा : बेन स्टोक्सची अजब कामगिरी, 142 वर्षांच्या इतिहास पहिल्यांचा घडला असा प्रकार

फायनलला भारतासमोर वेस्ट इंडिजचे आव्हान आहे हे समजलं तेव्हा कपिल देव यांनी खेळाडूंना आपण जिंकू असा विश्वास दिला. जेव्हा आपण वेस्ट इंडिजला पुन्हा पराभूत करू शकतो असं सांगितलं त्यावेळी सर्वांनी कपिल देव वेडे झाल्याचं म्हटलं असं के श्रीकांत यांनी सांगितले होते.

खेळाडूंनी जरी कपिल देव यांना वेड्यासारखा विचार करत आहे असं म्हटलं तरी त्यांच्या आत्मविश्वासाने आम्हाला नवी उर्जा मिळाली. वेस्ट इंडिजला आपण पराभूत करू शकतो असा विचार करायला सुरुवात केली आणि खरंच ते प्रत्यक्षात घड़लं.

VIDEO : युवा फलंदाजानं मोडला युवराजचा रेकॉर्ड, 6 चेंडूत लगावले 6 सिक्स!

अंतिम सामन्यात भारताला 54.4 षटकांत फक्त 183 धावा करता आल्या. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्करल्यासारखीच अवस्था होती. भारताकडून सलामीवीर के श्रीकांत यांनी 38 धावा केल्या होत्या. भारताने दिलेल्या 183 या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ फक्त 140 धावांपर्यंत मजल मारू शकला. वेस्ट इंडिजच्या दिग्गज फलंदाजांना बाद करून वर्ल्ड कपवर पहिल्यांदा नाव कोरण्याची कामगिरी भारताने करून दाखवली होती. त्यानंतरच भारतात क्रिकेटची लोकप्रियता वाढली.

एका सिक्ससाठी क्रिकेटपटू देणार 18 हजार! ‘हे’ आहे कारण

First published:

Tags: Cricket, Happy Birthday, Kapil dev