Home /News /sport /

या दिग्गज खेळाडूची धोनीच्या नेतृत्वात खेळण्याची इच्छा, IPLमध्ये चेन्नईकडून खेळणार?

या दिग्गज खेळाडूची धोनीच्या नेतृत्वात खेळण्याची इच्छा, IPLमध्ये चेन्नईकडून खेळणार?

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) याने एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वात खेळण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.

    मुंबई, 25 डिसेंबर : आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात चेन्नई (CSK) ची कामगिरी निराशाजनक झाली. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईच्या टीमला फायनल गाठता आली नाही. आयपीएलच्या पुढच्या मोसमात 10 टीम खेळणार नसल्यामुळे त्यातही चेन्नईची निराशा झाली. आयपीएलमध्ये 10 टीम खेळल्या असत्या, तर खेळाडूंचा मोठा लिलाव पार पडला असता, आणि चेन्नईला त्यांचे वयस्कर खेळाडू सोडून पुन्हा नवी टीम उभारता आली असती. एकीकडे चेन्नईच्या टीमला नवे खेळाडू शोधताना अडचण येत असतानाच न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) याने धोनीच्या नेतृत्वात खेळण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. केन विलियमसनच्या नेतृत्वात न्यूझीलंडच्या टीमने चांगली प्रगती केली आहे. विलियमसन कर्णधार असताना न्यूझीलंड 2016 टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पोहोचली होती, तर 2019 सालच्या वर्ल्ड कप फायनलमध्येही न्यूझीलंडने मजल मारली होती. आता आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्येही न्यूझीलंड पोहोचू शकते. सध्या न्यूझीलंडची टीम पाकिस्तानविरुद्ध घरच्या मैदानात टेस्ट सीरिज खेळणार आहे. त्याआधी एका मुलाखतीमध्ये बोलताना विलियमसन याने धोनीचं कौतुक केलं. इतिहासातला असा कोणी कर्णधार आहे का, ज्याच्या नेतृत्वात तुला खेळण्याची इच्छा आहे? असा प्रश्न विलियमसनला विचारण्यात आला. 'महेंद्रसिंग धोनी ज्या पद्धतीने गोष्टी हाताळतो, ते पाहणं मला आवडतं,' अशी प्रतिक्रिया विलियमसनने दिली. विलियमसन हा सध्या न्यूझीलंडचा पूर्णवेळ कर्णधार आहे. तर धोनीने 2014 साली टेस्ट टीमचं नेतृत्व सोडलं आणि मग कालांतराने त्याने मर्यादित ओव्हरचं कर्णधारपदही सोडून दिलं. यावर्षी 15 ऑगस्टला धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 2019 वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्धची सेमी फायनल धोनीची अखेरची मॅच ठरली. धोनीच्या अखेरच्या मॅचमध्येही केन विलियमसन विरोधी टीमचा कर्णधार होता.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या