'धवनला बाहेर काढा आणि केएल राहुलला खेळवा', दिग्गज क्रिकेटपटू भडकला

टी20 वर्ल्ड कपच्या दृष्टीकोनातून सध्याच्या संघाकडे बघत असाल तर काही प्रयोग करावेच लागतील असं मत के श्रीकांत यांनी व्यक्त केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 7, 2019 01:34 PM IST

'धवनला बाहेर काढा आणि केएल राहुलला खेळवा', दिग्गज क्रिकेटपटू भडकला

नवी दिल्ली, 07 नोव्हेंबर : भारताचा माजी क्रिकेटपटू कृष्णमचारी श्रीकांतने राजकोट टी20 मध्ये शिखर धवनबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी टीम इंडियात बदल करण्याचा सल्ला देताना शिखर धवनला बाहेर बसवून केएल राहुलला सलामीला संधी द्या असं म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाला लिहलेल्या लेखात के श्रीकांतने म्हटलं आहे की, जर टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीकोनातून तुम्ही बघत असाल तर असे प्रयोग करावेच लागतील.

के श्रीकांत यांनी शिखर धवनच्या 42 चेंडूत 41 धावांच्या खेळीवरून टीका केली. संघ व्यवस्थापनाने कॉम्बिनेशन बघायलाच हवं. गेल्या काही काळापासून भारतीय संघ पॉवर प्लेमध्ये अपेक्षेप्रमाणे खेळ करू शकलेला नाही. रोहितसोबत कोणताच फलंदाज ताकदीने उभा राहू शकत नाही. अशा फलंदाजाची गरज आहे जो पॉवर प्लेमध्ये चांगल्या पद्धतीने खेळू शकेल असं त्यांनी म्हटलं.

ऋषभ पंतच्या फलंदाजीवरही के श्रीकांत यांनी मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, विराट कोहली संघात नाही तर ऋषभ पंत चौथ्या नंबरवर खेळू शकतो. खरंतर टॉप 4 चा फॉर्म्युल्याकडे न बघता टी20 जिंका. जर तुम्ही एकदा भारताच्या टॉप ऑर्डरला व्यवस्थित केलं तर वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी होईलं असं वाटतं.

सध्या धोनीसोबत ऋषभ पंतची तुलना केली जाते त्यावरही के श्रीकांत यांनी फटकारलं आहे. ते म्हणाले की, मी जेव्हा खेळत होतो तेव्हा सुनील गावस्कर आणि कपिल देव मला नेहमीच सपोर्ट करायचे आणि मोकळेपणानं खेळण्याची सूट द्यायचे. माझ्यामते कसोटीसाठी साहा योग्य आहे पण मर्यादीत षटकांसाठी ऋषभ पंतला संधी दिली पाहिजे. त्याला सपोर्ट करण्याची गरज असून धोनीसोबत होणारी तुलना थांबवली पाहिजे असं के श्रीकांत म्हणाले.

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नांगरे पाटलांनी घेतली बैठक, म्हणाले...

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2019 01:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...