S M L

किदंबी श्रीकांत ठरला आॅस्ट्रेलियन ओपनचा विजेता

अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी आॅस्ट्रेलियन ओपनही श्रीकांत जिंकलाय

Sonali Deshpande | Updated On: Jun 25, 2017 01:08 PM IST

किदंबी श्रीकांत ठरला आॅस्ट्रेलियन ओपनचा विजेता

25 जून : इंडोनेशियन ओपन जिंकल्यानंतर अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी आॅस्ट्रेलियन ओपनही  श्रीकांत जिंकलाय.  जगात 11व्या क्रमांकाचा बॅडमिन्टनपटू असलेल्या श्रीकांतने  वर्ल्ड

चॅम्पियन चॅन लॉंगचा सरसकट पराभव केला.

चीनच्या चॅन लॉंगचा केवळ दोन गेम्समध्ये पराभव करण्याची श्रीकांतचीही पहिलीच वेळ आहे.पहिला गेम दोघांमध्ये अत्यंत रोमांचक झाला आणि 23 मिनीटं चालला . या अत्यंत रंगलेल्या खेळात 24 वर्षाच्या श्रीकांतने चॅनचा 22-20 असा पराभव केला. तर दुसरा गेम 21-16 असा एकहाती जिंकत श्रीकांतनं आॅस्ट्रेलियन ओपनवर  श्रीकांतने आपलं नाव कोरलं.श्रीकांतने त्याच्या करियरमध्ये जिंकलेलं हे चौथं सुपरसिरीज टायटल आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 25, 2017 01:06 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close