न्यूझीलंड-पाकिस्तान मॅचदरम्यान कॅमेरामध्ये कैद झाला आकाशातला दुर्मीळ क्षण!

न्यूझीलंड-पाकिस्तान मॅचदरम्यान कॅमेरामध्ये कैद झाला आकाशातला दुर्मीळ क्षण!

दुसऱ्या टी 20 मॅचमध्ये न्यूझीलंडने (New Zealand) पाकिस्तानचा (Pakistan) 9 विकेट्सने सहज पराभव केला. सेडन पार्कवर झालेली ही मॅच कव्हर करणाऱ्या कॅमेऱ्यात आकाशातला एक दूर्मिळ क्षण कैद झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 21 डिसेंबर : पाकिस्तान (Pakistan) ची क्रिकेट टीम सध्या न्यूझीलंडच्या (New Zealand) दौऱ्यावर आहे. न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान (NZ v PAK) यांच्यातील तीन टी 20 मॅचच्या सीरिजमध्ये सध्या न्यूझीलंडकडे 2-0 अशी विजयी आघाडी आहे. न्यूझीलंडने दुसऱ्या टी 20 मॅचमध्ये पाकिस्तानचा 9 विकेट्सने सहज पराभव केला. सेडन पार्कवर झालेली ही मॅच कव्हर करणाऱ्या कॅमेऱ्यात आकाशातला एक दुर्मीळ क्षण कैद झाला आहे.

काय घडले आकाशात?

पाकिस्तानने दिलेल्या टार्गेटचा न्यूझीलंडची टीम पाठलाग करत होती. न्यूझीलंडच्या इनिंगमधील 12 वी ओव्हर सुरु असताना  कॅमेरामनने आकाशातील दुर्मिळ क्षण कैद केला. त्याने गुरु आणि शनी या दोन ग्रहांची दुर्मिळ युती (Jupiter and  Saturn’s ring) कॅमेऱ्यात कव्हर केली. तो प्रसंग सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल (Viral) झाला आहे.

गुरु -शनी ग्रहांची दुर्मिळ युती

गुरु आणि शनी या दोन ग्रहांची सध्या अवकाशात युती झाली आहे. या दोन ग्रहांमधील अंतर जवळपास 400 वर्षांनी सध्या सर्वात कमी झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून हे अंतर सातत्यानं कमी होत आहे. सोमवारी हे अंतर सर्वात कमी म्हणजे अवघे 0.1 अंश इतके होणार असून त्यामुळे उघड्या डोळ्यांना हे दोन्ही ग्रह एक झाल्याचे दिसणार आहे.

यापूर्वी हे ग्रह 1623 साली हे दोन ग्रह एकमेकांच्या इतके जवळ आले होते. त्यानंतर आता थेट 60 वर्षांनी म्हणजे 15 मार्च 2080 रोजी ते पुन्हा इतके जवळ येणार आहेत. त्यामुळे अनेकांच्या आयुष्यातील ही एकमेव संधी आहे. दोन ग्रहांमध्ये अवकाशात होणारी ही युती पाहणे आणि तिचा अभ्यास करणे ही खगोल संशोधकांसाठी मोठी संधी असून गेल्या अनेक दिवसांपासून ते हा क्षण आपल्या दुर्बिणीतून टिपण्यासाठी सज्ज आहेत.

Published by: News18 Desk
First published: December 21, 2020, 5:02 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या