• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • jos the boss: बटलरने सामन्यानंतर उलगडले विक्रमी खेळीमागचे रहस्य

jos the boss: बटलरने सामन्यानंतर उलगडले विक्रमी खेळीमागचे रहस्य

jos buttler

jos buttler

जॉस बटलरने (Jos Buttler) यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमधलं (T20 World Cup) पहिलं शतक झळकावलं आहे. सामन्यानंतर त्याने विक्रमी खेळीमागचे रहस्य सांगितले आहे.

 • Share this:
  दुबई, 1 नोव्हेंबर: टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) इंग्लंडची धमाकेदार कामगिरी सुरूच आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडने (England vs Sri Lanka) 26 रननी दणदणीत विजय मिळवत सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले. या विजयात जॉस बटलरने (Jos Buttler) मोलाचा वाटा उचलला. त्याने यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमधलं (T20 World Cup) पहिलं शतक झळकावलं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात बटलरने 67 बॉलमध्ये नाबाद 101 रन केले. सामन्यानंतर त्याने विक्रमी खेळीमागचे रहस्य सांगितले आहे. जोस बटलरने या सामन्यात डावाची सुरुवात करताना 67 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 6 षटकारांचा साहाय्याने 101 धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर इंग्लंड संघाला 20 षटक अखेर 4 बाद 163 धावा करण्यात यश आले होते. या खेळीबाबत बोलताना जोस बटलर म्हणाला की, “मी संयम पाळला म्हणून मी खेळी खेळू शकलो. सुरुवातीला अडचणी आल्या होत्या, परंतु मॉर्गनसोबतची भागीदारी चांगली ठरली. या खेळीपट्टीवर फिरकी गोलंदाजांचा सामना करणे कठीण जात होते. परंतु आम्ही फलंदाजीचा पुरेपूर आनंद घेतला.” तसेच षटकार खेचून शतक पूर्ण करण्याबाबत तो म्हणाला की, “मी अंदाज लावत होतो की, तो कसा चेंडू टाकेल. त्यावेळी मी शांत होतो. परंतु बराच वेळ खेळपट्टीवर टिकून राहिल्यामुळे मी तो शॉट खेळू शकलो.” या शतकी खेळीसह जोस बटलर इंग्लंड संघासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारा फलंदाज ठरला आहे. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये बटलर जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. जॉस बटलरने याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यातही 32 बॉलमध्ये नाबाद 71 रन केले होते. कांगारूंविरुद्ध बटलरने 5 फोर आणि 5 सिक्स लगावल्या होत्या. बांगलादेशविरुद्ध बटलरने 18 रन केले, तर वेस्ट इंडिजविरुद्ध तो 24 रनवर नाबाद राहिला.

  इंग्लंड संघाचा जोरदार विजय

  श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंड संघाकडून प्रथम फलंदाजी करताना जोस बटलरने नाबाद 101 धावांची खेळी केली. तर कर्णधार ओएन मॉर्गनने 40 धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर इंग्लंड संघाला 20 षटक अखेर 4 बाद 163 धावा करण्यात यश आले होते.या धावांचा पाठलाग करताना श्रीलंका संघाकडून वाहिंदू हसरंगाने सर्वाधिक 34 धावांची खेळी केली. तर भानुका राजपक्षेने 26 धावांचे योगदान दिले. परंतु श्रीलंका संघाला हे आव्हान पूर्ण करण्यात अपयश आले. या सामन्यात इंग्लंड संघाने 26 धावांनी विजय मिळवला.
  Published by:Dhanshri Otari
  First published: