News18 Lokmat

VIDEO : 6 4 4 4 4 6...बटलरनं घेतली अल्झारी जोसेफची शाळा

43 चेंडूंत 8 चौकार व 7 षटकार खेचून 89 धावा करत बटलरनं राजस्थानला विजयाच्या जवळ नेले.

News18 Lokmat | Updated On: Apr 13, 2019 07:23 PM IST

VIDEO : 6 4 4 4 4 6...बटलरनं घेतली अल्झारी जोसेफची शाळा

मुंबई, 13 एप्रिल : आपल्या पर्दापणातच सहा विकेट घेत, आयपीएलमध्ये सगळ्यांची दाणादाण उडवून लावणारा अल्झारी जोसेफ याच्या गोलंदाजीची तारीफ होत असताना, आजच्या सामन्यात मात्र राजस्थानच्या फलंदाजांनी जोसेफची धुलाई केली.

राजस्थाननं प्रथम टॉस जिंकत मुंबईला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजी करत मुंबई संघानं राजस्थानसमोर 188 धावांचे आव्हान ठेवले आहे. मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा दुखपतीतून सावरत पुनरागमन करत असताना, चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. मुंबईकडून डी कॉकनं सर्वात जास्त 52 चेंडूत 81 धावा केल्या आणि बाद झाला. डी कॉकची ही खेळी आणि हार्दिक पांड्यांची शेवटच्या दोन षटकात कलेली फटकेबाजी यामुळं मुंबईनं 188 धावांचा डोंगर उभा केला.

या आव्हानाचा पाठलाग करताना, राजस्थानकडून सलमीचे फलंदाजी जॉस बटलर आणि अजिंक्य रहाणे यांनी आश्वासक सुरुवात केली. बटलर आणि अजिंक्य रहाणे यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. लक्ष्याचा पाठलाग करताना अजिंक्य रहाणे आणि जोस बटलर यांनी राजस्थानला दमदार सुरुवात करून दिली. त्याने जोसेफ अल्झारीच्या एका षटकात 17 धावा चोपून काढल्या. घरच्या मैदानावर खेळणारा अजिंक्य चांगल्या फॉर्मात दिसला. मात्र कृणाल पांड्याने अजिंक्य रहाणेला माघारी धाडत मुंबईला पहिलं यश मिळवून दिलं.

रहाणे बाद झाल्यानंतर बटलरनं मुंबईच्या गोलंदाजांविरोधात आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. अल्झारीने टाकलेल्या 13व्या षटकात बटलरने 6, 4, 4, 4, 4, 6 अशा 28 धावा चोपल्या. या खेळीच्या जोरावर बटलरनं या सामन्याची रुपरेषा बदलली आणि राजस्थानला सामन्याच्या जवळ आणून ठेवले.


Loading...
मात्र त्यानंतरच्या ओव्हरमध्ये लगेचच राहुल चहरने मुंबईला यश मिळवून दिले. त्याने 43 चेंडूंत 8 चौकार व 7 षटकार खेचून 89 धावा करणाऱ्या बटलरला बाद केले.VIDEO: निवडणूक चिन्हाचा असाही प्रचार; बॅटच्या आकारात केली पिकाची कापणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: ipl 2019
First Published: Apr 13, 2019 07:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...