मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: 'या' स्टार खेळाडूच्या पायाला गंभीर जखम; वर्ल्डकप संघातून वगळलं

T20 World Cup: 'या' स्टार खेळाडूच्या पायाला गंभीर जखम; वर्ल्डकप संघातून वगळलं

T20 World Cup: 'या' स्टार खेळाडूच्या पायाला गंभीर जखम; वर्ल्डकप संघातून वगळलं

T20 World Cup: 'या' स्टार खेळाडूच्या पायाला गंभीर जखम; वर्ल्डकप संघातून वगळलं

T20 World Cup: बेअरस्टोच्या पायाला दुखापत झाल्यामुळे त्याला टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडावं लागलं आहे. स्वत: बेअरस्टोनं सोशल मीडियाच्यामाध्यमातून आपल्या दुखापतीबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 4 ऑक्टोबर: येत्या 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया येथे आयसीसी टी-20 वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 16 देशांतील क्रिकेट टीम सहभागी होणार आहेत. महत्त्वाची स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना काही प्रमुख खेळाडू दुखापतींमुळे त्रस्त आहेत. अशा खेळाडूंमध्ये इंग्लंड टीममधील स्टार विकेटकीपर आणि बॅट्समन जॉनी बेअरस्टोचाही समावेश आहे. तो सध्या गंभीर दुखापतीचा सामना करत आहे. बेअरस्टोच्या पायाला दुखापत झाल्यामुळे त्याला टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडावं लागलं आहे. स्वत: बेअरस्टोनं सोशल मीडियाच्यामाध्यमातून आपल्या दुखापतीबाबत सविस्तर माहिती दिली आहे. आज तकनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

साधारण महिनाभरापूर्वी गोल्फ खेळताना जॉनी बेअरस्टोच्या पायाला दुखापत झाली होती. तपासणी केल्यानंतर पायाला तीन फ्रॅक्चर झाल्याचं निष्पन्न झालं. याशिवाय त्याचा घोटाही सरकला आहे. याच कारणामुळे टी-20 वर्ल्डकपसाठी निवडलेल्या इंग्लंडच्या टीममधून त्याला वगळण्यात आलं आहे. आता बेअरस्टोनं आपल्या दुखापतग्रस्त पायाचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

हेही वाचा: T20 World Cup : बुमराहच्या जागेवर कुणाला मिळणार वर्ल्ड कपचे तिकीट?

गोल्फ खेळताना तोल सावरण्याच्या प्रयत्नात जॉनी बेअरस्टो पडला होता. त्यामुळे त्याच्या पायाला दुखापत झाली होती. दुखापतीनंतर एका आठवड्यात बेअरस्टोच्या पायाचं ऑपरेशन करण्यात आलं आहे. परिणामी, पुढच्या वर्षापर्यंत त्याला क्रिकेट खेळता येणार नाही. बेअरस्टोनं सोमवारी (3 ऑक्टोबर) इन्स्टाग्रामवर याबाबत पोस्ट लिहिली आहे. 'माझा पाय तीन ठिकाणी फ्रॅक्चर झाला होता आणि माझा घोटाही सरकला होता. त्यामुळे ऑपरेशन करण्याची गरज पडली. आता माझं पहिलं ध्येय दोन्ही पायांवर व्यवस्थित उभं राहणं आणि सर्वकाही ठीक असल्याची खात्री करणं आहे,' अशी पोस्ट त्याने लिहिली आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडची टीम विजेतपदाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. भारतीय टीमही अनेक अनुभवी खेळाडूंविनाच मैदानात उतरणार आहे. त्यामुळे वर्ल्ड कप जिंकून परत येण्यासाठी त्यांना कसून प्रयत्न करावे लागतील.

टी-20 वर्ल्ड कपसाठी निवडलेली इंग्लंडची टीम : जोस बटलर (कॅप्टन), मोईन अली, अॅलेक्स हेल्स, हॅरी ब्रुक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टॉप्ली, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स आणि मार्क वूड.

रिझर्व प्लेअर्स: टायमल मिल्स, लियाम डॉसन आणि रिचर्ड ग्लिसन.

First published:

Tags: Cricket, England, T20 world cup 2022