VIDEO : बेअरस्टोनं गंडवलं, स्मिथची उडाली तारांबळ

VIDEO : बेअरस्टोनं गंडवलं, स्मिथची उडाली तारांबळ

अॅशेसमध्ये इंग्लंडसमोर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथला बाद करण्याचं आव्हान आहे.

  • Share this:

लंडन, 14 सप्टेंबर : अॅशेस मालिकेतील अखेरचा कसोटी सामना सुरू आहे. पाचव्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोनं स्मिथलं चकवण्यासाठी खोटी फिल्डिंग करण्याचं नाटक केलं. अॅशेस मालिकेत स्मिथने आतापर्यंत 671 धावा केल्या आहेत. त्यानं ओव्हलवरही अर्धशतकी खेळी केली. स्मिथला बाद करण्याचं आव्हान इंग्लंडसमोर होतं. तेव्हा जॉनी बेअरस्टोनं त्याचं लक्ष वळवण्यासाठी खोटी फिल्डिंग करण्याचं नाटक केलं.

स्मिथ फलंदाजी करत असताना दुसऱी धाव घेत होता. तेव्हा स्ट्रायकर एंडला जॉनी बेअरस्टो स्टम्पच्या मागे उभा होता. त्याला वाटलं की थ्रो त्याच्या दिशेने येईल आणि स्मिथला बाद करता येईल. बेअरस्टो चेंडू पकडण्याचा पवित्रा घेऊन उभा राहिला. त्यामुळं स्मिथला आपण धावबाद होऊ शकतो असं वाटलं आणि त्यांन सूर मारली. त्याचवेळी थ्रो आपल्याकडं येत नाही हे पाहून बेअरस्टो बाजूला झाला.

बेअरस्टोनं केलेल्या फिल्डिंगच्या दिखाव्यामुळं स्मिथ फसला खरा पण त्याला खिलाडूवृत्तीनं घेत हसत हसत तो सामोरं गेला. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज अँड्र्यू टायने ट्विटरवरून प्रश्न विचारला आहे. ही खोटी फिल्डिंग नाही का?

टायने विचारलेल्या प्रश्नानुसार जर ती खोटी फिल्डिंग असेल तर यासाठी दंड होऊ शकतो. कोणत्याही फिल्डरने शब्दांचा किंवा कृतीचा वापर करून फलंदाजाची एकाग्रता भंग करण्याचा प्रयत्न करणं चुकीचं आहे. याबद्दल पाच धावा फलंदाजी करणाऱ्या संघाला दिल्या जातात. याला खोटी फिल्डिंग असं म्हटलं जातं.

SPECIAL REPORT: राजे मंडळींनी राष्ट्रवादीची साथ सोडली; शरद पवार एकटे पडले?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 14, 2019 03:00 PM IST

ताज्या बातम्या