आधी जगासमोर प्रपोज अन् लग्नाआधीच जाॅन सीना आणि निक्की बेलाचं ब्रेकअॅप

जाॅन सिनाने मागील वर्षी रेसलमेनिया 33 मध्ये निक्की बेलाला सर्वांसमोर लग्नासाठी प्रपोज केलं होतं.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 16, 2018 10:15 PM IST

आधी जगासमोर प्रपोज अन् लग्नाआधीच जाॅन सीना आणि निक्की बेलाचं ब्रेकअॅप

16 एप्रिल : डब्ल्यूडब्ल्यूई स्टार जाॅन सीना, निक्की बेला या लोकप्रिय जोडीने अखेर वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या सहा वर्षांपासून ही दोघे एकत्र होते.

जाॅन सिनाने मागील वर्षी रेसलमेनिया 33 मध्ये निक्की बेलाला सर्वांसमोर लग्नासाठी प्रपोज केलं होतं. 2012 पासून जाॅन सिना आणि निकी बेला हे एकत्र होते. मात्र, या जोडीने वेगळं होण्याचा निर्णय घेऊन चाहत्यांना धक्का दिलाय. या जोडीला अलीकडे झालेल्या रेसलमेनिया 34 मध्ये एकत्र पाहण्यास आलं होतं. हे दोघे वेगळे का झाले याचं कारण अजून कळू शकलं नाही. पण, निकी बेलाने आपल्या इन्स्टाग्राॅम अकाऊंटवर वेगळं होण्याची बातमी जाहीर केलीये.

Loading...

निक्की बेला म्हणते, "निक्की बेला आणि जॉन सिना आम्ही गेल्या सहा महिन्यांपासून एकत्र होतो. आम्ही दोघांनी आता वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय.  हा निर्णय कठीण होता, तरीही आम्ही एकमेकांना खूप प्रेम आणि आदर देतो.  आमच्यातील नातेसंबंधाचा आम्ही आदर करतो."

निक्की बेला आणि जाॅन सिनाच्या वेगळ्या होण्याचा बातमीमुळे चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. अनेकांना अजूनही यावर विश्वास बसत नाही अशी प्रतिक्रिया टि्वटरवर दिल्यात.

We love you all ❤️

A post shared by Nikki Bella (@thenikkibella) on

जाॅन सीनाची प्रतिक्रिया

A post shared by John Cena (@johncena) on

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 16, 2018 10:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...