वेस्ट इंडिजच्या खेळाडूची IPL मध्ये धूम, खेळणार इंग्लंडकडून वर्ल्ड कप

इंग्लंडच्या संघाने या खेळाडूची आयर्लंड आणि पाकिस्तान विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवड केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 18, 2019 11:13 AM IST

वेस्ट इंडिजच्या खेळाडूची IPL मध्ये धूम, खेळणार इंग्लंडकडून वर्ल्ड कप

लंडन, 18 एप्रिल : राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला इंग्लंडच्या 17 जणांच्या संघात समाविष्ट करण्यात आलं आहे. आयर्लंड आणि पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. यामुळे त्याला वर्ल्ड कपच्या संघात स्थान पक्के करण्याची संधी मिळणार आहे.

बार्बाडोसमध्ये जन्म झालेल्या जोफ्रा आर्चरला वर्ल्ड कपसाठी इंग्लंडच्या 15 जणांच्या संघात स्थान मिळालं नाही. इंग्लंडला त्यांचा अंतिम संघ घोषित करण्यासाठी 23 मे पर्यंत मुदत आहे. तोपर्यंत ते संघात बदल करू शकतात.

जोफ्रा 2014 मध्ये 3 वेळा वेस्ट इंडिजच्या अंडर 19 संघातून खेळला आहे. त्यानंतर त्याने इंग्लंडकडून खेळण्याचा निर्णय घेतला. जोफ्रा आर्चरचे वडील इंग्लंडचे असून त्याच्याकडे ब्रिटीश पासपोर्ट आहे. वर्ल्ड कपच्या संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला पुढच्या दोन्ही मालिकांमध्ये खेळावं लागेल. यात त्याच्या कामगिरीवर वर्ल्ड कपचं तिकिट त्याला मिळणार की नाही हे निश्चित होईल.

आयपीएलमध्ये राजस्थानकडून खेळताना त्याने 8 सामन्यात 10 विकेट घेतल्या आहेत. सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत कसिगो रबाडा 17 विकेटसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्या नंतर चेन्नईचा इम्रान ताहीर 15 विेकेट, आरसीबीचा युझवेंद्र चहल 13 विकेट, त्यानंतर मोहम्मद शमी 12 विकेटसह चौथ्या स्थानावर आहे.

...तर पंत, रायडु आणि सैनीला वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी

Loading...

इंग्लंडने घोषणा केलेल्या संघाचे नेतृत्व इयॉन मॉर्गनकडे दिलं आहे. त्याशिवाय मोईन अली, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, सॅम करन, जो डेनले, अॅलेक्स हेल्स, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, जो रूट, जासन राय, बेन स्टोक्स, डेव्हिड विले, क्रिस वोक्स, मार्क वूड यांचाही या संघात समावेश आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2019 11:13 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...