राजस्थान रॉयल्स संघाला IPLआधीच मोठा धक्का, वर्ल्ड कप गाजवणाऱ्या विदेशी खेळाडूने घेतली माघार!

राजस्थान रॉयल्स संघाला IPLआधीच मोठा धक्का, वर्ल्ड कप गाजवणाऱ्या विदेशी खेळाडूने घेतली माघार!

मार्चमध्ये सुरू होणार्‍या इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या हंगामाची उत्सुकचा चाहत्यांमध्ये वाढली आहे. मात्र या हंगामाआधीच राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला आहे.

  • Share this:

लंडन, 07 फेब्रुवारी : मार्चमध्ये सुरू होणार्‍या इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या हंगामाची उत्सुकचा चाहत्यांमध्ये वाढली आहे. मात्र या हंगामाआधीच राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील महत्त्वाचे खेळाडू इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर उजव्या हाताला दुखापतीमुळे आयपीएल 2020 मधून बाहेर पडला आहे. एवढेच नाही तर आर्चर इंग्लंड दौर्‍यासाठी श्रीलंका दौर्‍याबाहेरही आहे.

नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका इंग्लंड दौर्‍यादरम्यान आर्चरला दुखापत झाली. आता तपासणीत असे दिसून आले आहे की उजव्या हाताच्या कोपराला फ्रॅक्चर आहे, यामुळे तो जवळपास तीन महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. दक्षिण आफ्रिका दौर्‍यावर तो दुसऱ्या आणि तिसर्‍या कसोटीत खेळला नाही, त्यानंतर चौथ्या कसोटीसाठी त्याला संघातून वगळण्यात आले. दक्षिण आफ्रिकेहून इंग्लंडला परतल्यानंतर त्याच्या दुखापतीचे स्कॅन झाले, त्यानंतर त्याला तीन महिन्यांसाठी विश्रांती घ्यावी लागणार आहे.

वाचा-शानदार फॉर्ममध्ये असलेल्या राहुलवर खुश नाहीत दिग्गज क्रिकेटपटू, ‘हे’ आहे कारण

IPLमध्ये जोफ्रा आर्चरचे प्रदर्शन

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने आयपीएलमध्ये एकूण 21 सामने खेळले आहेत. यात त्याने 26 बळी घेतले आहेत. वर्ष 2018 मध्ये, त्याने 15 बळी घेऊन 10 सामने खेळले. वर्ष 2019 मध्ये, आर्चरने 11 सामन्यांत 11 गडी बाद केले.

वाचा-आता दिसणार सचिन VS युवराज! असा आहे Bushfire League मध्ये दिग्गजांचा संघ

2019मध्ये त्याने 400 षटके टाकली

विशेष म्हणजे, जोफ्रा आर्चरने वर्ष 2019 मध्ये इंग्लंडकडून सर्वाधिक 400 षटके टाकली. आर्चेरने 400.5 षटके टाकली, तर दुसर्‍या स्थानावर स्टुअर्ट ब्रॉडने 367.4 षटके टाकली. बेन स्टोक्सने 336.2, ख्रिस वॉक्स 299.4, मोईन अली 231.2, सॅम कारेन 201.5 आणि आदिल रशीद यांनी 201.5 षटके गोलंदाजी केली.

वाचा-केएल राहुलच्या फॉर्मने फक्त पंतचे नाही तर दिग्गज क्रिकेटपटूंचेही करिअर संपवले

जास्त गोलंदाजीमुळे झाला जखमी?

जोफ्रा आर्चर (Jofra Archer) आपल्या खतरनाक गोलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र गेल्या वर्षभरात जास्त क्रिकेट खेळल्यामुळं त्याला ही दुखापत झाली असावी. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याच्या गोलंदाजीने कहर केला होता. एवढेच नाही तर आयसीसी वर्ल्ड कप 2019मध्ये इंग्लंडला चॅम्पियन बनवण्यात जोफ्राचे महत्त्वाचे योगदान होते. मात्र सतत क्रिकेट खेळल्यामुळं जोफ्राला दुखापतींना सामारे जावे लागले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 7, 2020 10:04 AM IST

ताज्या बातम्या