140 दिवसात बदललं जोफ्रा आर्चरचं नशीब, विराट कोहलीपेक्षा जास्त पगार

140 दिवसात बदललं जोफ्रा आर्चरचं नशीब, विराट कोहलीपेक्षा जास्त पगार

इंग्लंडच्या खेळाडूंचे पगार वाचून तुमचेही डोळे फिरतील.

  • Share this:

लंडन, 21 सप्टेंबर : क्रिकेट हा असा खेळ आहे, ज्याची भारत आणि इंग्लंड या दोन देशांमध्ये सर्वात जास्त चाहते आहेत. भारतात तर क्रिकेट खेळाडूंची पूजा केली जाते. यात विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी ही नाव आघाडीवर असतात मात्र पगाराच्या तुलनेत इंग्लंडचे खेळाडू भारतीय खेळाडूंच्या पुढे गेले आहेत. वर्ल्ड कप आणि अशेस मालिकेत दमदार कामगिरी करणारा इंग्लंडचा जलद गोलंदाज जोफ्रा आर्चरचे प्रदर्शन पाहते त्याला इंग्लंड क्रिकेट बोर्डानं मोठे गिफ्ट दिले आहे. जोफ्रा आर्चरला इंग्लंड क्रिकेट बोर्डानं कसोटी आणि सीमित ओव्हरच्या क्रिकेटमध्ये केंद्रीय अनुबंध गटात सामिल केले आहे. 24 वर्षीय आर्चरनं वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त तर ऑस्ट्रेलिया विरोधात झालेल्या अशेस मालिकेत 20.27च्या सरासरीनं 22 विकेट घेतल्या आहेत. आर्चरनं 2018पासून इंग्लडकडून खेळण्यास सुरुवात केल्यानंतर 2019-20मध्ये चांगली कामगिरी केली.

टीम इंडियापेक्षा या इंग्लंडच्या खेळाडूंना मिळणार जास्त पगार

बीसीसीआयनं 2019-20मध्ये काही खेळाडूंना अ प्लस आणि अ अशा दोन गटांमध्ये सामिल केले होते. यात रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या तीन खेळाडूंना अ प्लसमध्ये स्थान मिळाले. यांना प्रत्येकी 7 कोटी पगार देण्यात येत आहे. मात्र इंग्लंडच्या खेळाडूंना 1 मिलीयन म्हणजे 9 कोटी देण्यात येणार आहेत.

(वाचा-पाकसोबत कुणी येईना खेळायला, आफ्रिदीनं पुन्हा ओकली भारताबद्दल गरळ!)

या इंग्लंडच्या खेळाडूंना 9 कोटी मानधन

कसोटी आणि टी-20 खेळणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूंना या लिस्टमध्ये सामिल करण्यात आले आहे. यात जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, जॉस बटलर, जो रूट, बेन स्टोक्स आणि क्रिस वोक्स यांना प्रत्येक वर्षी 9 कोटी रूपये मिळणार आहेत. तर, भारताचा कर्णधार विराट कोहलीला 7 कोटी मानधन दिले जाते.

(वाचा-शुद्ध घी विरुद्ध डालडा! द्रविडसोबतच्या फोटोमुळं शास्त्री पुन्हा झाले ट्रोल)

काय आहे या करारांचा अर्थ

कसोटी करार खेळणाऱ्या या खेळाडूंना एका वर्षासाठी 6 लाख पाऊंड म्हणजे 53 कोटी रूपये मिळतात. तर, एकदिवसीय करारमध्ये असलेल्या खेळाडूंना 2.75 लाख पाऊंड म्हणजे 25 कोटी रूपये मिळणार आहे.

(वाचा-IPL: मुंबई इंडियन्सची बल्ले बल्ले; विराटच्या संघाला मोठा झटका!)

SPECIAL REPORT : जागावाटपावरून महाआघाडीतही धुसफूस!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 21, 2019 07:30 AM IST

ताज्या बातम्या