S M L

IPL 2019 : ‘हार्दिक में तीसरी बार गलती नहीं करता’, पाहा या गोलंदाजानं काय केलं

आर्चरनं तीन महत्वाचे झेल सोडले. याचा फटका राजस्थानला नक्कीच बसणार आहे.

Updated On: Apr 20, 2019 07:02 PM IST

IPL 2019 : ‘हार्दिक में तीसरी बार गलती नहीं करता’, पाहा या गोलंदाजानं काय केलं

जयपूर, 20 एप्रिल : मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या रंगत असलेल्या सामन्यात एक मजेशीर प्रसंग घडला. आधीच आपला पुर्व कर्णधार अजिंक्य रहाणेला कर्णधारपदावरुन हटवल्यामुळं राजस्थानचा संघ आपला नवीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ याच्या नेतृत्वाखाली खेळत होता.

प्रथम टॉस जिंकत राजस्थाननं गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि हा निर्णय राजस्थानच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. श्रेयस गोपाळच्या किफायतशीर गोलंदाजीमुळं मुंबईला 161 धावा करता आल्या. यात डी कॉकच्या 65 धावांचे मोठे योगदान आहे. दरम्यान राजस्थाननं या सामन्यात अनेक झेल सोडले. यात आर्चरनं तीन महत्वाचे झेल सोडले. याचा फटका राजस्थानला नक्कीच बसणार आहे.जोफ्रा आर्चरनं क्विंचन डी कॉक केवळ सहा धावांवर असताना त्याचा झेल सोडला होता. त्यानंतर डी कॉकनं दमदार फलंदाजी केली आणि 65 धावा केल्या. त्यानंतर आर्चरनं 16व्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्या केवळ 2 धावांवर खेळत असताना, त्याचा झेल सोडला. जयदेव उनाडकटच्या चेंडूवर हार्दिक मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात होता. त्यानंतर पुन्हा एकदा हार्दिकला आर्चरनं जीवनदान दिलं.19व्या ओव्हरमध्ये उनाडकटच्याच चेंडूवर पांड्या उंच शॉट मारण्याच्या नादात आर्चरच्या हातात आलेला झेल सुटला. यामुळं उनाडकटही त्याच्यावर नाराज झाला. अखेर शेवटच्या षटाकत आर्चरनं स्वत: आपल्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकला बाद केलं.हार्दिक पांड्यानं शेवटच्या टप्प्यात फटकेबाजी करत १५ चेंडूत २३ धावा केल्या. पण २०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर तो बाद झाला. त्यामुळं आर्चरनं मी तिसऱ्यांदा चूक करत नाही...हे सिध्द केलं. पण डी कॉकचा झेल सुटल्याचा फटका राजस्थानला बसण्याची शक्यता आहे.


VIDEO : अखेर साध्वीच्या वादग्रस्त विधानावर उद्धव ठाकरे बोलले, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: ipl 2019
First Published: Apr 20, 2019 06:27 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close