मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020: भारतीयांना अभिमान वाटावा असा VIDEO, पाहा इंग्लंडच्या क्रिकेटपटूनं केलेला बिहू डान्स

IPL 2020: भारतीयांना अभिमान वाटावा असा VIDEO, पाहा इंग्लंडच्या क्रिकेटपटूनं केलेला बिहू डान्स

या सामन्यात राजस्थानचा पराभव झाला असला तरी देखील जोफ्रा आर्चर आणि रियान पराग यांचा बिहू डान्स चर्चेचा विषय ठरला आहे.

या सामन्यात राजस्थानचा पराभव झाला असला तरी देखील जोफ्रा आर्चर आणि रियान पराग यांचा बिहू डान्स चर्चेचा विषय ठरला आहे.

या सामन्यात राजस्थानचा पराभव झाला असला तरी देखील जोफ्रा आर्चर आणि रियान पराग यांचा बिहू डान्स चर्चेचा विषय ठरला आहे.

  • Published by:  Priyanka Gawde
दुबई, 15 ऑक्टोबर : आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात दिल्लीने तुषार देशपांडे या नवोदित खेळाडूला संधी दिली. दिल्लीने प्रथम बॅटिंग करत 161 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थानला 148 धावाच करता आल्या. या सामन्यात विजय मिळवत दिल्लीने पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. या सामन्यात राजस्थानचा पराभव झाला असला तरी देखील जोफ्रा आर्चर आणि रियान पराग यांचा बिहू डान्स चर्चेचा विषय ठरला आहे. या सामन्यात आर्चरने आपल्या चार ओव्हरमध्ये 19 धावा देत चार विकेट घेतल्या. पण सामन्यातील पहिल्याच बॉलवर त्याने दिल्लीच्या पृथ्वी शॉ याला आऊट केलं. या बॉलवर त्याने टाकलेल्या जबरदस्त इनस्विंगवर पृथ्वी शॉ आऊट झाला. त्यानंतर आर्चर आणि परागने केलेले सेलिब्रेशन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या दोघांनी बिहू डान्स करत सेलिब्रेशन केलं. वाचा-बापरे बाप! 'या' गोलंदाजानं ट्रेनलाही टाकलं मागे, 156 KM/HR वेगानं केली गोलंदाजी सनरायजर्स हैदराबादच्या विजयानंतर परागने बिहू डान्स करत विजय सेलिब्रेट केला होता. त्यानंतर आज जोफ्रा आर्चर याला देखील हे नृत्य त्याने शिकवलं आहे. हा डान्स व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. वाचा-…म्हणून IPLमध्ये चांगली कामगिरी करू शकत नाही आहे मॅक्सवेल, स्वत: सांगितलं कारण भारतीय संघाचा माजी खेळाडू इरफान पठाण याने एक इंग्लिश खेळाडू बिहू डान्स कसं काय करू शकतो ? असे ट्विट करत आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर अनेक जणांनी ट्विट करत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. वाचा-'या' संघानं मुंबई इंडियन्सआधी प्ले ऑफमध्ये जागा केली पक्की गुगलवर जोफ्रा ट्रेंड या डान्सनंतर ईशान्य भारतातील नागरिकांनी जोफ्रा आर्चरविषयी जाणून घेण्यासाठी गुगलवर मोठ्या प्रमाणत सर्च केलं. मुख्यत्वे आसाम, झारखंड आणि त्रिपुरामधील नागरिकांनी या संदर्भात आधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या नागरिकांनी जोफ्रा आर्चर कोण आहे? त्याचं मूळ कोणत्या देशातील आहे?, अशी माहिती गुगलवर जास्त प्रमाणात सर्च केली.
First published:

पुढील बातम्या