रावळपिंडी, 03 डिसेंबर : कोरोनामुळे क्रिकेटमध्ये काही नियम बदलण्यात आले. यातलाच एक नियम म्हणजे चेंडूला लाळ किंवा थुंकी लावण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. चेंडूला चकाकी आणण्यासाठी पारंपरिक पद्धतीने खेळाडु लाळेचा वापर करत होते. मात्र बंदी घातल्यानंतर खेळाडुंकडे चेंडू चमकावण्यासाठी घामाशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही.
सामन्यावेळी गोलंदाज किंवा कर्णधार चेंडू हातावर, डोक्यावर घासताना दिसतात. त्यामुळे घामाचे थेंब चेंडूला लावून त्याला चकाकी आणण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र अनेकदा खेळाडू चेंडूला चकाकी आणण्यासाठी असे काही प्रकार करतात जे पाहून हसू आवरत नाही. असाच काहीसा प्रकार पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्या सामन्यावेळी बघायला मिळाला.
हेही वाचा : सोशल मीडियावर रंगली धावपटूच्या समलैंगिक विवाहाची चर्चा; PHOTO पाहून नेटकरी म्हणाले...
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात खेळण्यात येत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने चेंडू चमकावण्यासाठी एक नवी पद्धत वापरली. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रूटने चेंडू चक्क फिरकीपट्टू जॅक लीचच्या डोक्यावर घासला आणि चमकावण्याचा प्रयत्न केला.
Astute method of shining cricket ball, remember you can't use saliva https://t.co/ezqkXICFOC
— Monty Panesar (@MontyPanesar) December 3, 2022
जॅकनेसुद्धा जो रूटला चेंडूला चकाकी आणण्यासाठी तो डोक्यावर घासण्यास परवानगी दिली. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने हा चेंडूशी छेडछाड करण्याचा प्रकार असल्याचं म्हटलंय.
हेही वाचा : विमानात जेवण नाही अन् आता लगेजही सापडेना; एअरलाइन्सवर भारतीय क्रिकेटपटू संतापला
इंग्लंडचा माजी कर्णधार माँटी पानेसरनेसुद्धा बार्मी आर्मीकडून शेअर केलेल्या व्हिडीओवर कमेंट केली आहे. त्याने म्हटलं की, चेंडूला चकाकी आणण्यासाठी ही सर्वोत्तम पद्धत आहे. क्रिकेटचा चेंडू चमकावण्याची एकदम परफेक्ट पद्धत आहे. लक्षात ठेवा तुम्ही लाळ वापरू शकत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, England, Pakistan, Viral videos