मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /धोनीने झिवासोबत केली पहिलीच जाहिरात; बाप-लेकीचा VIDEO VIRAL

धोनीने झिवासोबत केली पहिलीच जाहिरात; बाप-लेकीचा VIDEO VIRAL

धोनीने  (MS Dhoni) आपली मुलगी जीवा धोनी (Ziva dhoni) सोबत एक कमर्शिअल जाहिरात (Commercial ad) केली आहे. सोशल मीडियावर (Social media) जीवाची सातत्याने वाढती लोकप्रियता पाहता एका बिस्किट कंपनीने जीवाशी करार केला आहे.

धोनीने (MS Dhoni) आपली मुलगी जीवा धोनी (Ziva dhoni) सोबत एक कमर्शिअल जाहिरात (Commercial ad) केली आहे. सोशल मीडियावर (Social media) जीवाची सातत्याने वाढती लोकप्रियता पाहता एका बिस्किट कंपनीने जीवाशी करार केला आहे.

धोनीने (MS Dhoni) आपली मुलगी जीवा धोनी (Ziva dhoni) सोबत एक कमर्शिअल जाहिरात (Commercial ad) केली आहे. सोशल मीडियावर (Social media) जीवाची सातत्याने वाढती लोकप्रियता पाहता एका बिस्किट कंपनीने जीवाशी करार केला आहे.

नवी दिल्ली, 09 जानेवारी: टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) ने मागच्या वर्षी 15 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर तो आयपीएलमध्ये चेन्नईचा कर्णधार म्हणून युएईमध्ये खेळला. आयपीएल संपल्यानंतर धोनी पत्नी साक्षी, मुलगी झिवा आणि मित्र परिवारासोबत पुन्हा दुबईला फिरायला गेला होता. कुटुंबासोबत वेळ घालवत असतानाच त्याचे रांचीच्या शेतामध्ये मेहनत करतानाचे, स्ट्रॉबेरी खातानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच गाजले, यानंतर आता धोनीचा त्याची मुलगी झिवासोबतचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही तो अनेक ब्रँडचा चेहरा म्हणून कायम आहे. आता धोनीनं  आपली मुलगी झिवा धोनी (Ziva Dhoni) सोबतही एक कमर्शिअल जाहिरात केली आहे. सोशल मीडियावर झिवाची सातत्याने वाढती लोकप्रियता पाहता एका बिस्किट कंपनीने जीवाशी करार केला आहे. झिवा ही फक्त पाच वर्षांची आहे, पण इन्स्टाग्रामवर तिचे 18 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

संबंधित जाहिरातीचा व्हिडिओ झिवा धोनीनं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड केला आहे. दिग्दर्शकाने 'गो' बोलताच झिवा आणि महेंद्रसिंग धोनी बिस्किट खात डान्स करु लागतात. हा व्हिडीओ शेअर करताना झिवा धोनीनं लिहिलं की, “मस्ती टाईम ...” हा शूटिंगचा अनुभव सांगत धोनी म्हणाला की 'झिवाबरोबर पहिल्यांदा शूटिंग करणे माझ्यासाठी आनंददायक अनुभव आहे. आमच्या आवडत्या बिस्किटांसह स्क्रीनवर हालचाली करणं, खुपच मजेदार होतं.'

याशिवाय झिवानं वडील धोनीसोबत तिच्या इंस्टाग्रामवर एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती आपल्या वडिलांच्या खांद्यावर लटकलेली दिसत आहे. सोशल मीडियामध्येही हा फोटो चांगलाच पसंत केला जात आहे.

दुसरीकडे, धोनी नुकताच आपल्या कुटुंबासोबत सुट्टी घालवल्यानंतर दुबईहून मायदेशी परतला आहे. काल त्यानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केला. ज्यामध्ये तो आपल्या फॉर्ममध्ये स्ट्रॉबेरी खाताना दिसत आहे

View this post on Instagram

A post shared by M S Dhoni (@mahi7781)

गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तथापि तो युएईमध्ये आयपीएल 2020 मध्ये खेळताना दिसला आहे. यावेळी त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघ काही खास कामगिरी करू शकला नाही. असं असूनही आयपीएल 2021 साठी चेन्नई सुपर किंग्जने धोनीच्या कर्णधारपदावर आपला विश्वास कायम राखला आहे.

First published:

Tags: Cricket, MS Dhoni