मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Jhulan Goswami: अखेरच्या सामन्यात बॅटिंगसाठी उतरली झुलन, इंग्लंडकडून गार्ड ऑफ ऑनर पण त्यानंतर...

Jhulan Goswami: अखेरच्या सामन्यात बॅटिंगसाठी उतरली झुलन, इंग्लंडकडून गार्ड ऑफ ऑनर पण त्यानंतर...

झुलन शेवटच्या मॅचमध्ये बॅटिंगसाठी मैदानात उतरताना

झुलन शेवटच्या मॅचमध्ये बॅटिंगसाठी मैदानात उतरताना

Jhulan Goswami: कारकीर्दीतल्या शेवटच्या सामन्यात झुलन गोस्वामीला बॅटिंग करण्याची संधी मिळाली. नवव्या नंबरवर बॅटिंगला आहेल्या झुलनला आपल्या या शेवटच्या मॅचमध्ये मात्र पहिल्याच बॉलवर माघारी परतावं लागलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

लंडन, 24 सप्टेंबर: इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर भारत आणि इंग्लंड महिला संघातला तिसरा वन डे सामना सुरु आहे. पण हा सामना भारताची महान गोलंदाज झुलन गोस्वामीच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतला अखेरचा सामना ठरणार आहे. या सामन्यानंतर झुलन आपल्या दोन दशकांच्या क्रिकेट कारकीर्दीला पूर्णविराम देणार आहे. दरम्यान या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून भारताला पहिल्यांदा बॅटिंगचं आमंत्रण दिलं. पण स्मृती मानधना आणि दिप्ती शर्माच्या अर्धशतकानंतरही भारताचा डाव 169 धावात आटोपला.

झुलन 'गोल्डन डक'वर आऊट

कारकीर्दीतल्या शेवटच्या सामन्यात झुलन गोस्वामीला बॅटिंग करण्याची संधी मिळाली. नवव्या नंबरवर बॅटिंगला आहेल्या झुलनला आपल्या या शेवटच्या मॅचमध्ये मात्र पहिल्याच बॉलवर माघारी परतावं लागलं. इंग्लंडच्या फ्रेया केंपच्या बॉलवर ती गोल्डन डकची शिकार बनली.

हेही वाचा - Roger Federer: फेडरर-नदालला रडताना पाहून विराट कोहलीनं केली इमोशनल पोस्ट, म्हणाला खेळांच्या दुनियेतलं...

इंग्लंडकडून 'गार्ड ऑफ ऑनर'

दरम्यान लॉर्डसवर कारकीर्दीतली शेवटची इनिंग खेळण्यासाठी झुलन जेव्हा मैदानात उतरली तेव्हा इंग्लंड संघानं तिला गार्ड ऑफ ऑनर दिला. दोन्ही बाजूनं इंग्लिश खेळाडू आणि अम्पायर्सनी झुलनला अखेरच्या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या. पण तिच्या पहिल्याच बॉलवर माघारी परतल्यानंतर चाहत्यांची मात्र निराशा झाली.

First published:

Tags: Cricket, Cricket news