विराट, सचिनबद्दल अंजली- अनुष्काला जे गुपित माहित नाही ते इंग्लंडच्या या ड्रायव्हरला माहितीये

विराट, सचिनबद्दल अंजली- अनुष्काला जे गुपित माहित नाही ते इंग्लंडच्या या ड्रायव्हरला माहितीये

ऑस्ट्रेलियाचा संघ मालिका जिंकल्यानंतर रात्री दोन वाजेपर्यंत चेंजिंग रुममध्येच राहायचा

  • Share this:

टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. जगाच्यापाठी भारतीय क्रिकेट संघ कुठेही गेला तरी त्यांचे चाहते त्यांच्यासोबत असतात. पण फक्त चाहतेच नही तर असेही काही लोक आहेत जे टीम इंडियासोबत सदैव असतात. आम्ही बोलतोय ते टीम इंडियाचे बस चालक जेफ गुडविन यांच्याबद्दल. भारतीय क्रिकेट संघ कोणत्या देशात मालिका खेळण्यासाठी गेला तर त्यांना एका शहरातून दुसऱ्या शहरात नेण्याचे काम गुडविन करतात.

बोर्ड ऑफ कंट्रोल ऑफ क्रिकेट इन इंडियाने (बीसीसीआय) त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर गुडविन यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जेफ भारतीय खेळाडूंबद्दल बोलताना दिसत आहेत. टीम इंडियाचे कौतुक करताना गुडविन म्हणाले की, मी आजपर्यंत एवढी शिस्तबद्ध टीम पाहिली नाही. मी जेव्हापासून क्रिकेट टीमसाठी मी चालक म्हणून काम सुरू केलं तेव्हाची क्रिकेट खेळण्याची शैली आणि आजची शैली यात खूप फरक आहे. आधी ऑस्ट्रेलियाचा संघ मालिका जिंकल्यानंतर रात्री दोन वाजेपर्यंत चेंजिंग रुममध्येच राहायचा, पण आता असं होतं नाही. उलट टीम इंडिया सामना संपल्यानंतर लगेच स्टेडिअमच्या बाहेर पडते. टीम इंडियाची ही शिस्त मला फार आवडते.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबद्दल बोलताना गुडविन म्हणाले की, ‘माझ्या मुलानेही टीम इंडियासाठी चालक म्हणून काम केले आहे. तो जेव्हा गाडी चालवायचा तेव्हा सचिन नेहमी त्याच्या बाजूलाच बसायचा. तेव्हा सचिन नेहमी माझ्या मुलाला सांगायचा की त्याचे बाबा खूप मोठे स्टार आहेत. त्या वर्षाच्या अखेरपर्यंत माझा मुलगाही स्टार झाला. तो आता २१ वर्षांचा आहे. मला आणि माझ्या मुलाला भारत सरकारकडून आभार व्यक्त करणारे पत्र आले होते.’

भारतीय खेळाडू सुरेश रैनाबद्दल बोलताना गुडविन म्हणाले की, काही वर्षांपूर्वी माझ्या पत्नीची तब्येत खराब होती. यावेळी माझ्या मदतीला रैना धावून आला. रैनाने माझ्यासाठी त्याच्या टी- शर्टचा लीलाव केला. त्याने केलेली ही मदत मी कधीच विसरू शकत नाही. कर्णधार कोहलीबद्दल बोलताना जेफ म्हणाले की, अनेकदा तो माझी मस्करी करत असतो. तर त्याच्या शेजारी बसलेल्या युजवेंद्रकडे पाहून ‘हा मला ओल्ड मॅन अशी हाक मारतो,’ असेही जेफ म्हणाले.

 

First published: July 24, 2018, 11:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading