• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • 19 व्या वर्षी पदार्पण, नंतर 11 वर्ष टीम इंडियाची दारं बंद, हा खेळाडू झाला निराश

19 व्या वर्षी पदार्पण, नंतर 11 वर्ष टीम इंडियाची दारं बंद, हा खेळाडू झाला निराश

न्यूझीलंडविरुद्धची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंडविरुद्धच्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी (India vs England) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.

 • Share this:
  मुंबई, 24 मे : न्यूझीलंडविरुद्धची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंडविरुद्धच्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी (India vs England) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यात फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) जागा मिळाली नाही, पण डावखुरा फास्ट बॉलर असलेला जयदेव उनाडकटही (Jaydev Unadkat) निवड न झाल्यामुळे निराश आहे. 19 व्या वर्षी उनाडकटने टेस्टमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं, पण मागच्या 11 वर्षांमध्ये त्याला टेस्ट खेळण्याची संधी मिळाली नाही. स्पोर्ट्स स्टारने दिलेल्या वृत्तानुसार जयदेव उनाडकट टीम इंडियामध्ये पुन्हा निवड होत नसल्यामुळे नाराज आहे, पण अजूनही त्याला पुनरागमनाची अपेक्षा आहे. भारताकडून एक टेस्ट, 7 वनडे आणि 10 टी-20 खेळलेला उनाडकट म्हणाला, 'जेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमध्ये मला स्थान मिळालं नाही, तेव्हा मला वाटलं की तो निर्णय योग्य होता, कारण त्यावेळी टीममध्ये सगळे फिट होते. जेव्हा बहुतेक खेळाडूंना दुखापत झाली, तेव्हा अनेकांना संधी मिळाली, पण त्यावेळी माझीही निवड झाली पाहिजे होती, असं मला वाटलं.' 2010 नंतर उनाडकटने एकही टेस्ट मॅच खेळलेली नाही. इंग्लंड दौऱ्यासाठी निवड होईल, असं त्याला वाटलं होतं, पण स्टॅण्डबाय खेळाडूंमध्येही उनाडकटला संधी मिळाली नाही. जेव्हा टीममध्ये सर्वोत्तम खेळाडू असतात, तेव्हा तुम्हाला वाट पाहावीच लागते, पण इंग्लंड दौऱ्यावर निवड न झाल्यामुळे मी निराश आहे, पण तरी मी स्वत:ला प्रोत्साहन देत आहे, अशी प्रतिक्रिया उनाडकटने दिली. 'मी सध्या 29 वर्षांचा आहे, वयाच्या 19व्या वर्षी मी टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, त्यामुळे लोक मला म्हातारा समजत आहेत. माझ्याकडे आणखी बराच वेळ आहे', असं तो म्हणाला. उनाडकटने 89 प्रथम श्रेणी मॅचमध्ये 327 विकेट घेतल्या आहेत. 2019-2020 च्या रणजी ट्रॉफी मोसमात त्याला 67 विकेट मिळाल्या. फास्ट बॉलर म्हणून एवढ्या विकेट घेण्याचा हा विक्रम आहे. 2010 साली सेन्च्युरियनमध्ये उनाडकट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकमेव टेस्ट खेळला होता. त्या मॅचमध्ये उनाडकटला एकही विकेट मिळाली नव्हती.
  Published by:Shreyas
  First published: