Home /News /sport /

'निवड समितीने वारंवार दुर्लक्ष केलं तरी...' टीम इंडियाच्या खेळाडूचं थेट चॅलेंज

'निवड समितीने वारंवार दुर्लक्ष केलं तरी...' टीम इंडियाच्या खेळाडूचं थेट चॅलेंज

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) पाच टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली, पण यात डावखुरा फास्ट बॉलर जयदेव उनाडकटला (Jaydev Unadkat) संधी देण्यात आली नाही, त्यामुळे त्याने नाराजी व्यक्त केली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 25 मे : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) पाच टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली, पण यात डावखुरा फास्ट बॉलर जयदेव उनाडकटला (Jaydev Unadkat) संधी देण्यात आली नाही, त्यामुळे त्याने नाराजी व्यक्त केली आहे. एवढच नाही तर निवड समितीने वारंवार माझ्याकडे दुर्लक्ष केलं तरी माझ्या क्षमतेपेक्षा चांगला खेळ करायला मला कोणीही रोखू शकणार नाही, असं थेट चॅलेंज उनाडकटने दिलं आहे. 2010 साली उनाडकट भारताकडून एकमेव टेस्ट खेळला होता, तर 2018 साली तो शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळला. उनाडकटने रेकॉर्ड 67 विकेट घेत सौराष्ट्रला पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) जिंकवून दिली. कोरोना महामारीमुळे देशात यंदा लाल बॉलच्या क्रिकेटचं आयोजन करण्यात आलं नाही. उनाडकटला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही निवडण्यात आलं नाही. यानंतर भारतात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्येही त्याला संधी मिळाली नाही. आता इंग्लंड दौऱ्यातही संधी मिळत नसल्यामुळे आपण निराश असल्याचं उनाडकट म्हणाला आहे. एवढच काय पण इंग्लंड दौऱ्यासाठी स्टॅण्डबाय खेळाडूंमध्येही त्याची निवड करण्यात आलेली नाही. पीटीआय-भाषाशी बोलताना उनाडटकट म्हणाला, 'मी पुढचे तीन ते चार वर्ष आपल्या करियरच्या शिखरावर असेन. मी विकेटही घेत आहे, त्यामुळे मी चांगली कामगिरी करत असल्याचं दिसत आहे. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आणि वेगवेगळ्या खेळपट्टीवर मी विकेट काढण्याच्या पद्धती मी शोधून काढत आहे, त्यामुळे माझीही वेळ येईल, असं मला वाटतं.' निवड ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, टीम इंडियामधली तुमची निवड भारत ए आणि स्थानिक क्रिकेटच्या कामगिरीमुळे होते, पण कोरोनामुळे या स्पर्धाही झाल्या नाहीत, असं उनाडकट म्हणाला. टीम इंडिया जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे, या दौऱ्यात वनडे आणि टी-20 सीरिज होणार आहे. या दौऱ्यात जयदेव उनाडकटला संधी मिळते, का ते पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, Team india

    पुढील बातम्या