भारतीय गोलंदाजाच्या घरी लगीनघाई! कोरोनाच्या धाकात उरकला साखरपुडा

भारतीय गोलंदाजाच्या घरी लगीनघाई! कोरोनाच्या धाकात उरकला साखरपुडा

याच गोलंदाजाने तीन दिवसांपर्वी आपल्या संघाला चॅम्पियन केले होते. आता तो लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाला आहे.

  • Share this:

राजकोट, 16 मार्च : एकीकडे कोरोनामुळे सर्व क्रिकेट सामने आणि स्पर्धा रद्द झाल्या असताना भारतीय गोलंदाजाने या दहशतीतही आपला साखरपुडा उरकला. याच गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर तीन दिवसांपूर्वीच आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिले होते. आता त्यानं साखरपुडा करत सर्वांना खुश केले.

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट यांने रणजी करंडकमध्ये सौराष्ट्र संघाला विजेतेपद मिळवून दिल्यानंतर आता सोशल मीडियाच्या आपल्या साखरपुड्याची घोषणा केली आहे. जयदेवने रिन्नी नावाच्या आपल्या मैत्रिणीशी साखरपुडा केला आहे. त्यानं आपल्या अधिकृत ट्विटर रिन्नीसोबतचे फोटो पोस्ट केले.

वाचा-ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूने भारतीय तरुणीसोबत दुसऱ्यांदा केला साखरपुडा

वाचा-जर्मनीत अडकला भारताचा दिग्गज खेळाडू, कोरोनामुळे 15 दिवस तुटला कुटुंबाशी संपर्क

जयदेव उनाडकट भारतीय संघाबाहेर असला तरी, रणजीमधील त्याच्या खेळीचा फायदा त्याला नक्कीच होईल. जयदेवच्या नेतृत्वाखाली प्रथमच सौराष्ट्र संघाने रणजी करंडक जिंकला. या हंगामात जयदेव उनाडकटने जबरदस्त गोलंदाजी करत गोलंदाजी केली आणि सर्वाधिक 67 विकेटही घेतल्या. रणजीतील या शानदार यशानंतर त्याची टीम इंडियामध्ये निवड होण्याची प्रतीक्षा आहे.

भारतीय कसोटी संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराही साखरपुडा कार्यक्रमाला उपस्थित होता. पुजारानेही सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत जयदेवचे अभिनंदन केले.

वाचा-‘रात्री स्वप्नात यायचा बुमराह आणि...’, दिग्गज फलंदाजाचा धक्कादायक खुलासा

वाचा-VIDEO : ‘कब्र बनेगी तेरी’, जेव्हा ख्रिस गेल फिल्मी बोलतो तेव्हा काय होतं पाहा

या रणजी मोसमात जयदेवने 67 विकेट घेतल्या, रणजी क्रिकेटच्या इतिहासात या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात जास्त विकेट आहेत. रणजी मोसमात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम बिहारचा गोलंदाज आशुतोष अमनने 2018-19 सत्रात केला होता. त्याने एका मोसमात 68 विकेट्स घेतल्या होत्या. जयदेव बर्या च दिवसांपासून टीम इंडियाच्या बाहेर होता आणि या कामगिरीनंतर त्याने भारतीय संघात परतण्याची आशा व्यक्त केली.

First published: March 16, 2020, 2:09 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading