मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /'...त्याची पुन्हा टीम इंडियामध्ये निवड होणार नाही', निवड समिती सदस्याचा धक्कादायक खुलासा

'...त्याची पुन्हा टीम इंडियामध्ये निवड होणार नाही', निवड समिती सदस्याचा धक्कादायक खुलासा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी (India vs England) टीम इंडियाची निवड करण्यात आली. या टीममध्ये डावखुरा फास्ट बॉलर जयदेव उनाडकटला (Jaydev Unadkat) संधी मिळाली नाही, त्यामुळे त्याने नाराजीही व्यक्त केली.

पुढे वाचा ...

मुंबई, 28 मे : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी (India vs England) टीम इंडियाची निवड करण्यात आली. या टीममध्ये डावखुरा फास्ट बॉलर जयदेव उनाडकटला (Jaydev Unadkat) संधी मिळाली नाही, त्यामुळे त्याने नाराजीही व्यक्त केली. 30 वर्षांच्या जयदेव उनाडकटने 2019-20 च्या रणजी ट्रॉफी मोसमात विक्रमी 67 विकेट घेतल्या आणि सौराष्ट्रला पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी जिंकवून दिली. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात एका मोसमातल्या या सर्वाधिक विकेट होत्या, तरीही उनाडकटची ऑस्ट्रेलिया दौरा आणि इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झाली नाही.

रणजी ट्रॉफीमधल्या या कामगिरीनंतर जयदेवला टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्याची आशा होती, पण निवड समितीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्याच्याऐवजी मोहम्मद सिराज (Mohammad Siraj), नवदीप सैनी (Navdeep Saini) आणि टी.नटराजन (T.Natrajan) याला संधी मिळाली. 2010 साली उनाडकट भारताकडून एकमेव टेस्ट खेळला. जयदेव उनाडटकटला डावलण्यात आल्याबद्दल भारताचे माजी फास्ट बॉलर आणि सौराष्ट्रचे माजी प्रशिक्षक करसन घावरी (Karsan Ghavari) यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. उनाडकटसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद झाल्याचं आपल्याला निवड समितीच्या सदस्याने सांगितलं असल्याचं घावरी म्हणाले, ते टाईम्स ऑफ इंडियाशी बोलत होते.

'जर एखादा बॉलर 60 पेक्षा जास्त विकेट घेत असेल आणि स्वत:च्या टीमला फायनलमध्ये पोहोचवत असेल, तर त्याची इंडिया-ए साठीही निवड होऊ नये? असा सवाल मी निवड समिती सदस्याला विचारला. तेव्हा त्याने उनाडकटची टीम इंडियासाठी निवड होणार नाही, असं मला सांगितलं. आम्ही जेव्हा 30 खेळाडूंचा विचार करतो, तेव्हाही उनाडकटचं नाव घेतलं जात नाही,' असं निवड समितीने आपल्याला सांगितल्याचा दावा घावरी यांनी केला आहे.

'मी याबद्दलचं कारण त्यांना विचारलं. तसंच एवढ्या विकेट घेण्याचा फायदा काय, असा प्रश्नही उपस्थित केला. तेव्हा वयामुळे आम्ही त्याचा विचार करत नसल्याचं उत्तर निवड समितीकडून मिळालं. आम्ही तरुण खेळाडूमध्ये गुंतवणूक करू, कारण तो देशासाठी जास्त काळ खेळू शकेल. आम्ही वयस्कर खेळाडूंमध्ये गुंतवणूक का करू? त्यापेक्षा आम्ही 21, 22, 23 वर्षांच्या खेळाडूंना संधी देऊ, हे खेळाडू 10-12 वर्ष भारतासाठी खेळू शकतात. आज आम्ही उनाडकटला घेतलं, तर तो देशासाठी किती वर्ष खेळेल?,' असा प्रश्न निवड समितीने आपल्याला विचारल्याचं करसन घावरी यांनी सांगितलं.

एका टेस्ट मॅचशिवाय उनाडकट भारतासाठी 7 वनडे आणि 10 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचही खेळला.

First published:
top videos

    Tags: Cricket, Team india