मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /U19 महिला वर्ल्ड कप विजेत्या संघाला जय शहांनी दिलं विशेष आमंत्रण, मोठ्या बक्षिसाची घोषणा

U19 महिला वर्ल्ड कप विजेत्या संघाला जय शहांनी दिलं विशेष आमंत्रण, मोठ्या बक्षिसाची घोषणा

भारताने इंग्लंडला अंतिम सामन्यात 7 विकेटने धूळ चारली. या विजयानंतर बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे अभिनंदन केलं आहे.

भारताने इंग्लंडला अंतिम सामन्यात 7 विकेटने धूळ चारली. या विजयानंतर बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे अभिनंदन केलं आहे.

भारताने इंग्लंडला अंतिम सामन्यात 7 विकेटने धूळ चारली. या विजयानंतर बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे अभिनंदन केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 29 जानेवारी : अंडर 19 महिला वर्ल्ड कपच्या पहिल्याच स्पर्धेत भारताच्या संघाने इतिहास घडवत विजेतेपद पटकावलं. भारताने इंग्लंडला अंतिम सामन्यात 7 विकेटने धूळ चारली. या विजयानंतर बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे अभिनंदन केलं आहे. तसंच भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या संघाला खास आमंत्रण दिले असून मोठ्या बक्षिसाची घोषणासुद्धा केलीय. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर इंग्लंडला 68 धावात बाद केलं आणि 69 धावांचे आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. भारताच्या सौम्या तिवारी आणि त्रिशा यांनी प्रत्येकी 24 धावांची खेळी केली.

जय शहा यांनी भारतीय संघाचं अभिनंदन करताना म्हटलं की, आमच्या युवा क्रिकेटपटूंनी देशाला अभिमान वाटावा अशी ही अभूतपूर्व कामगिरी आहे. सर्व युवा खेळाडू मोठ्या सामन्यात न घाबरता, कोणतंही दडपण न घेता खेळले. यातून त्यांचे व्यक्तिमत्व आणि कणखर स्वभावाची झलक दिसते अशा शब्दात जय शहा यांनी कौतुक केलं.

हेही वाचा : Champions! पहिला U19 महिला वर्ल्ड कप जिंकणाऱ्या 11 रणरागिणी, पाहा फोटो

भारताच्या विजेत्या संघाला भारत आणि न्यूझीलंड पुरुष संघाच्या तिसऱ्या टी20 सामन्यावेळी जय शहा यांनी आमंत्रित केलं आहे. आपल्या अतुलनिय अशा कामगिरीचा जल्लोष साजरा करण्याची गरज असून शफाली वर्मा आणि तिचा संघ नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये तिसऱ्या टी20 सामन्यात उपस्थित असेल असंही जय शहा यांनी म्हटलं.

वर्ल्ड कप विजेत्या भारतीय क्रिकेट संघाला 5 कोटी रुपयांच्या बक्षीसाची घोषणाही जय शहा यांनी जाहीर केली. ते म्हणाले की, भारतीय महिला क्रिकेटची प्रगती होत आहे. आता वर्ल्ड कप जिंकल्यामुळे महिला क्रिकेटचा दर्जा आणखी उंचावला. या संपूर्ण संघासाठी आणि सपोर्ट स्टाफसाठी ५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करताना मला आनंद होत आहे.

First published:

Tags: Cricket