CAA आणि NRC वादात पाकची उडी, क्रिकेटवरून जावेद मियाँदादनं ओकली गरळ

CAA आणि NRC वादात पाकची उडी, क्रिकेटवरून जावेद मियाँदादनं ओकली गरळ

जावेद मियाँदादनं ICCकडे अजब मागणी, म्हणे भारतात क्रिकेट खेळू नका कारण...

  • Share this:

कराची, 28 डिसेंबर : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदादनं (Javed Miandad) गरळ ओकत हास्यास्पद वक्तव्य केले आहे. मियाँदादनं भारत असुरक्षित असून, आयसीसीनं (ICC) विदेशी खेळाडूंना क्रिकेट खेळण्यासाठी या देशात पाठवू नये, अशी अजब मागणी केली आहे. एकीकडे 2009मध्ये श्रीलंका संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व विदेशी खेळाडूंनी पाकमध्ये खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर 10 वर्षांनी पाकमध्ये श्रीलंकेनं मालिका खेळण्याचे मान्य केले. त्यामुळे ‘मियाँदादच्या उलट्या बोंबा’, अशी प्रतिक्रिया जगभरातील चाहते देत आहेत.

मियाँदादनं एका पाकिस्तानी वेबसाईटला दिलेल्या माहितीत, 'ICCने पुढे येऊन जगातल्या सर्व देशांना सांगितले पाहिले की भारतात क्रिकेट खेळू नका. कारण भारत हा सध्या असुरक्षित देश आहे. भारतात त्यांचीच लोक एकमेकांविरोधात लढत आहेत. त्यामुळं आयसीसीनं हे पाऊल उचलण्याची गरज आहे’, असे सांगितले.

वाचा-'भेदभाव केला जात असता तर हिंदू असलेला दानिश कनेरिया पाकिस्तान संघात खेळला नसता'

वाचा-शोएब मलिकनं फोटो पोस्ट करत घेतला धोनीशी पंगा, चाहत्यांनी ट्विटरवर काढली इज्जत

'पाकिस्तान नाही भारत असुरक्षित'

जावेद मियॉंदादनं या मुलाखतीत, 'आयसीसीला माझा संदेश आहे की सर्व देशांनी भारताचे दौरे थांबवावेत. आता आपण पाहू शकता, आता आम्ही आयसीसीचा न्याय पाहतो की ते काय करतात आणि जगाला काय म्हणतात. भारतात काय घडत आहे हे लोकांनी पाहिले पाहिजे. मी आयसीसीला विनंती करतो की त्यांचा (भारत) बहिष्कार टाका. भारत असुरक्षित आहे, पाकिस्तान नाही. माणूस म्हणून आपण खेळाडूंनी उभे राहिले पाहिजे”, असे बिनडोक मत व्यक्त केले.

वाचा-पाकमध्ये हिंदू क्रिकेटपटूचा छळ, भाजपने शेअर केला शोएब अख्तरचा VIDEO

'सर्व देशांनी भारतावर कारवाई केली पाहिजे'

जावेद मियांदाद एवढ्यावरच थांबला नाही तर, 'तेथे काय चालले आहे, याविषयी संपूर्ण जग पहात आहे आणि बोलत आहे. मी पाकिस्तानच्या वतीने बोलत आहे की भारताशी सर्व प्रकारच्या खेळांचे संबंध संपले पाहिजेत. सर्व देशांनी भारताविरूद्ध कारवाई केली पाहिजे”, अशी मुक्ताफळेही उधळली.

वाचा-पाकिस्तानने 67 वर्षांत फक्त दोनच हिंदूना क्रिकेट संघात दिली जागा!

दानिक प्रकरणानंतर केला पाकचा बचाव

कायम वादाच्या भोवऱ्यात राहणारे पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांनी माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया याच्यावर गंभीर आरोप केले आहे. पाकिस्तानात हिंदूंसह इतर अल्पसंख्याकांसोबत भेदभाव केला जात असता तर हिंदू असलेला दानिश कनेरिया पाकिस्तान संघासाठी 10 वर्षे खेळूच शकला नसता, असे जावेद मियाँदाद यांनी म्हटले आहे. दानिश कनेरिया हा विश्वासपात्र नाही. तो पैशासाठी काहीही बोलू शकतो, असा आरोपही मियाँदाद यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 28, 2019 02:30 PM IST

ताज्या बातम्या