काश्मीर मुद्द्यावर जावेद मियांदाद म्हणाला, 'बॅटनं षटकार मारले आता तर माझ्या हातात तलवार'

काश्मीर मुद्द्यावर जावेद मियांदाद म्हणाला, 'बॅटनं षटकार मारले आता तर माझ्या हातात तलवार'

पुन्हा एकदा कलम 370वरून जावेद मियांदादनं उधळली मुक्ताफळे

  • Share this:

कराची, 01 सप्टेंबर : जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्ताननं भारतावर टीका करण्यात सुरुवात केली. ही त्यांची पहिली वेळ नाही, मात्र आता सध्या सीमेवर आणि पाकव्याप्त काश्मीर भागात पाकिस्तानमधील खेळाडू आणि अभिनेते रॅली काढत आहे. यात भारतीय नेत्यांवर टीका करणे हे एवढेच त्यांचे मुख्य काम असल्याचे चित्र दिसत आहे. याआधी शाहिद आफ्रिदीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना हिटलरशी केली होती.

दरम्यान आता, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेय मियांदादचा भारतावर टीका करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जावेद हातात तलवार घेत, तलवार चालवण्याच्या बाता करत आहे. या व्हिडिओमध्ये जावेदनं काश्मीर बांधवांना आव्हानही केले आहे.

सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये जावेद, “माझ्या काश्मीरच्या भावंडांनो तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे. माझ्याकडे जेव्हा बॅट होती तेव्हा मी गोलंदाजांना षटकार मारायचो, आता माझ्या हातात तलावर आहे. बॅटनं षटकार मारू शकतो मग माणसाला नाही मारू शकत का?”, असे धक्कादायक विधान केले आहे.

वाचा-‘आम्ही अणुबॉम्ब वापरू, भारताला एका फटक्यात साफ करू’; माजी पाक खेळाडू बरळला

यावर भारतीय संघाचा माजी खेळाडू आकाश चोप्रासह सोशल मीडियावर चाहत्यांनी टिका करण्यात सुरुवात केली आहे.

वाचा-काश्मीर मुद्द्यावर पुन्हा बरळला आफ्रिदी, एका ट्वीटने गंभीरनं केली बोलती बंद!

याआधीही जावेद मियांदादनं उधळली मुक्ताफळे

पाकिस्तानी चॅनलनं काश्मीर मुद्द्यावर प्रश्न विचारले असता, “तुमच्याकडे जर सामग्री आहे तर, तुम्ही हल्ला केला पाहिजे. प्रत्येकवेळी नियम तुमच्या मदतीला येणार नाही. जेव्हा त्यांचे शव घरी जातील, तेव्हा त्यांना अक्कल येईल”, अशी मुक्ताफळे उधळली. तसेच, जेव्हा मियादांद यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काय सल्ला देणार असे विचारले असता, “मी आधीही सांगितले आहे, भारत एक भित्रा देश आहे. त्यांनी आतापर्यंत केले काय आहे. अणुअस्त्र आम्ही असेच नाही ठेवले आहेत. एक संधी आणि भारत पूर्ण साफ करून देईल”, असे भडकाऊ विधान केले होते.

पाकिस्तान खेळाडूंचे वादग्रस्त विधान

जावेद मियादांद यांच्या आधी पाकचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीनं संयुक्त राष्ट्रसंघाने या प्रकरणी लक्ष घालावं असं म्हटलं होतं. त्यानंतर पाकिस्तानी संघाचा कर्णधार सर्फराज अहमदनेही प्रतिक्रिया दिली होती. ईद साजरी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सर्फराज म्हणाला की, मी अल्लाहकडे प्रार्थना करतो की या कठीण काळात आमच्या काश्मीरी बांधवांची मदत कर. तर, रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरनंही यावरून ट्वीट केलं आहे. त्यानं दुखापत झालेल्या लहान मुलाचा फोटो पोस्ट केला आहे. त्यानं म्हटंल आहे की, बलिदानाचा अर्थ तुम्ही सांगितलात, तुमच्या स्वातंत्र्यासाठी प्रार्थना करतो. आम्ही तुमच्या सोबत आहोत असं म्हणत त्यानं ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

वाचा-चाहत्यांच्या संतापानंतर अख्तरची बिनशर्त माघार, म्हणाला...

Ganesh Chaturthi 2019: गणेशोत्सवात भारताबाहेर असलेल्या सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचा देखावा

First published: September 1, 2019, 9:33 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading