जयपूर पोलिसांच्या जाहिरातीवर बुमराह संतापला, सुनावले खडेबोल

जयपूर पोलिसांच्या जाहिरातीवर बुमराह संतापला, सुनावले खडेबोल

"जयपूर पोलीस खूप छान !!!, आपल्या देशासाठी खेळताना सर्व काही झोकून दिल्यानंतर आपल्याला कसा सन्मान मिळतो हे तुम्ही दाखवून दिलंत."

  • Share this:

24 जून : भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी चॅम्पियन्सच्या फायनलमध्ये एक नो बॉल काय टाकला आणि जयपूर पोलिसांनी चक्क झेब्रा स्पीड ब्रेकरच्या जाहिरातीवरच झळकवला. जयपूर पोलिसांच्या या खोडसाळपणाविरोधात बुमराहने ट्विटरवरून जाहीर नाराजी व्यक्त केलीय.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात बुमराहने टाकलेला हा नो बॉल भारतीय संघाला चांगलाच महागात पडला. कारण या नोबॉलवर जीवदान मिळालेल्या फकर झमानने नंतर थेट सेंच्युरी मारत 114 धावा पिटल्या आणि पाकिस्तानचा विजय सूकर केला. या नोबॉलच्या चुकीवरून भारतीय क्रिकेट चाहत्यांनी बुमराहवर बरीच टीकाही केली. पण जयपूर पोलिसांनी हद्दच केली. त्यांनी चक्क झेब्रा क्रासिंगच्या जाहिरातीवरच बुमराहच्या नो बॉलचा फोटा झळकवला. या जाहिरातीत त्यांनी वाहतूक नियम मोडल्यास काय होतं असा खरमरीत संदेशही लिहून टाकला. या संदेशात जयपूर पोलीस म्हणतात....

जयपूर पोलिसांचा संदेश

''लक्ष्मणरेषा ओलांडू नका, महागात पडू शकते''

जयपूर पोलिसांच्या खोडसाळपणामुळे बुमराह चांगलाच दुखावला गेलाय. त्यानेही मग ट्विटरवरूनच जयपूर पोलिसांचा खरपूस समाचार घेतलाय. या ट्विटमध्ये बुमराह म्हणतो....

"जयपूर पोलीस खूप छान !!!, आपल्या देशासाठी खेळताना सर्व काही झोकून दिल्यानंतर आपल्याला कसा सन्मान मिळतो हे तुम्ही दाखवून दिलंत."

खरंतर खेळाकडे नेहमीच खिलाडूवृत्तीने पाहिलं पाहिजे पण जेव्हा भारत-पाक क्रिकेट सामन्याचा विषय येतो तेव्हा आपण सर्वच त्याला धर्मयुद्धाचं स्वरूप देऊन मोकळे होतो. हे पूर्णतः चुकीचं आहे म्हणूनच जयपूर पोलिसांच्या चुकीला माफी ही नाहीच मिळाली पाहिजे. कारण खेळात चुका या होतच असतात आणि आपणही त्याला खिलाडू वृत्तीनेच घेतलं पाहिजेत.

 

First published: June 24, 2017, 8:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading