IPL 2020 : पुढच्या IPLमध्ये जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्स सोडणार? ‘या’ एका फोटोमुळं क्रिकेटविश्वात खळबळ

IPL 2020 : पुढच्या IPLमध्ये जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्स सोडणार? ‘या’ एका फोटोमुळं क्रिकेटविश्वात खळबळ

IPL 2020मध्ये जसप्रीत बुमराह विराट कोहलीच्या बंगळुरू संघात सामिल होणार?

  • Share this:

मुंबई, 26 ऑक्टोबर : आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी संघ म्हणून मुंबई इंडियन्स संघाकडे पाहिले जाते. मुंबई इंडियन्स संघान आतापर्यंत चार वेळा विजेतेपद मिळवले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई संघानं 2013, 2015, 2017 आणि 2019मध्ये ही कामगिरी केली. यात मोलाचा वाटा होता तो जसप्रीत बुमराहचा. मात्र सध्या एका फोटोमुळं बुमराह मुंबई इंडियन्स सोडणार की काय अशा चर्चा रंगल्या आहेत.

मुंबई इंडियन्स संघाचे मालक मुकेश अंबानी यांनी आपल्या आयपीएल संघासाठी प्री दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन केल होते. जिओ वर्ल्डमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुंबई इंडियन्स संघाचे सर्वच सपोर्ट स्टाफ आणि खेळाडू उपस्थित होते.

दरम्यान दिवाळीच्या या फोटोमध्ये भारताचा स्टार खेळाडू जसप्रीम बुमराह उपस्थित नसल्यामुळं चाहत्यांनी याचा वेगळा अर्थ काढला. पाठीला झालेल्या दुखापतीमुळं बुमराह सध्या संघाबाहेर आहे. सप्टेंबरमध्ये वेस्ट इंडिज विरोधात बुमराहनं अखेरचा सामना खेळला होता. दक्षिण आफ्रिका विरोधात बुमराहला विश्रांती देण्यात आली होती. त्याचबरोबर बांगलादेश दौऱ्यातही त्याला संघात घेण्यात आले नाही. त्यामुळं सध्या भारताबाहेर उपचार घेत असलेला बुमराह दिवाळी पार्टीसाठी मुंबई इंडियन्स संघासोबत उपस्थित राहू शकला नाही.

वाचा-मॉलमध्ये पाणी विकताना दिसला विराट कोहली, पाहा काय आहे VIRAL VIDEO मागचं सत्य

वाचा-‘साधे बूट बांधता येत नाहीत आणि चालले धोनीची मापं काढायला’

मुंबई इंडियन्सनं शेअर केलेल्या ग्रुप फोटोमध्ये कर्णधार रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, अनुकूल रॉय, सिद्धेश लाड, जयंत यादव, सूर्यकुमार यादव यांच्यासोबतच महेला जयवर्धने, जहीर खान आणि युवराज सिंगही उपस्थित होते. मात्र, बुमराहच्या अनुपस्थितीमुळं चाहत्यांनी, तो आता विराट कोहलीच्या आरसीबी संघात जाणार आहे का? असा सवाल केला. यावर मुंबई इंडियन्स संघानं आपल्या वेगळ्या अंदाजात GIF शेअर करत शांत राहा असे उत्तर दिले.

वाचा-क्रिकेटमधील अजब कारवाई, संघ संपावर गेला म्हणून कर्णधाराचं करिअर धोक्यात

जसप्रीत बुमराहला शोधण्याचे काम खरतर मुंबई संघाने केले. 19 वर्षांचा असताना बुमराहनं 2013मध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले. आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये त्यानं विराट कोहलीला बाद केले आणि तो चर्चेत आला. दरम्यान 2016मध्ये बुमराहला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली.

Published by: Priyanka Gawde
First published: October 26, 2019, 4:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading