मुंबई, 9 मार्च : टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. 14 आणि 15 मार्चला गोव्यामध्ये बुमराहचं लग्न होईल, असं वृत्त स्पोर्ट्सकीडाने दिलं आहे. प्रसिद्ध स्पोर्ट्स एँकर संजना गणेशन (Sanjana Ganeshan) सोबत बुमराहचं लग्न होईल, असंही स्पोर्ट्सकीडाने सांगितलं आहे.
कोण आहे संजना गणेशन?
संजनाने आयपीएल आणि 2019 वर्ल्ड कपमध्ये एँकरिंग केलं आहे. तसंच ती कोलकाता नाईट रायर्डस या आयपीएलच्या टीमसाठीही एँकरिंग करते. संजनाने एमटीव्हीचा रियलिटी शो स्पिल्ट्स व्हिलामधून टीव्हीवर पदार्पण केलं. 2013 साली तिने फेमिना गॉर्जियस हा पुरस्कार जिंकला होता. पुण्याच्या प्रसिद्ध कॉलेजमध्ये संजनाने इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं, पण यानंतर ती मॉडेलिंगच्या क्षेत्रात वळली. 2014 साली ती मिस इंडियाच्या फायनलपर्यंत पोहोचली होती.
Today, be as carefree as @SanjanaGanesan
Grab your #KKR merchandise now! 💜💛Link in bio.@Bewakoof_IN #GullyLiveFast pic.twitter.com/g6pwazWF9M
— KolkataKnightRiders (@KKRiders) March 8, 2021
जेठालालचा व्हिडिओ व्हायरल
कोलकाता नाईड रायडर्सनी संजना गणेशनचे फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. या फोटोंवर युजर्सनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. यातला जेठालालची कमेंट असलेला एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. तसंच अनेकांनी संजना आता कोलकात्याला नाही तर मुंबई इंडियन्सना सपोर्ट करेल, अशा कमेंटही अनेकांनी केल्या आहेत.
She will cheer now Mumbai Knight Riders 👍🏻 pic.twitter.com/2UfHoJg4sr
— Dark Knight 🐴 (@DarkKnightRised) March 8, 2021
लग्न करणार असल्यामुळे जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्धची चौथी वनडे आणि टी-20 सीरिजमधून माघार घेतली. वनडे सीरिजमध्ये तो खेळणार का नाही, याबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही.