Home /News /sport /

इंग्लंडमध्ये 35 वर्षांनी घडणार इतिहास, रोहितच्या अनुपस्थितीमध्ये नव्या कॅप्टनवर मोठी जबाबदारी

इंग्लंडमध्ये 35 वर्षांनी घडणार इतिहास, रोहितच्या अनुपस्थितीमध्ये नव्या कॅप्टनवर मोठी जबाबदारी

भारताला विश्वविजेते बनवणाऱ्या कपिल देव यांनी 1987 मध्ये भारतीय संघाचे अखेरचे नेतृत्व केले होते. म्हणजेच 35 वर्षांनंतर एखादा वेगवान गोलंदाज भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळेल.

  नवी दिल्ली, 30 जून : टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पाचव्या कसोटी सामन्यात कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. हा कसोटी (ENG विरुद्ध IND 5वी कसोटी) सामना 1 जुलैपासून एजबॅस्टन येथे सुरू होईल. बुमराह त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत प्रथमच भारतीय संघाचे कर्णधारपद स्वीकारताना दिसणार आहे. आता त्याच्यावर केवळ गोलंदाजीच नाही तर संघाचे नेतृत्व करण्याचीही अतिरिक्त जबाबदारी असेल. नियमित कर्णधार रोहित शर्मा सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे क्वारंटाईनमध्ये आहे. या सामन्यात त्याच्या खेळण्याबाबत अजूनही साशंकता आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मात्र संघ व्यवस्थापन शेवटच्या क्षणापर्यंत रोहितच्या कोरोना चाचणीच्या निकालाची वाट पाहणार असल्याचे म्हटले आहे. जसप्रीत बुमराहला भारतीय संघाचे कर्णधारपद मिळाल्यास कपिल देव यांच्यानंतर वेगवान गोलंदाज म्हणून संघाचे नेतृत्व करणारा तो दुसरा भारतीय ठरेल. भारताला विश्वविजेते बनवणाऱ्या कपिल देव यांनी 1987 मध्ये भारतीय संघाचे अखेरचे नेतृत्व केले होते. म्हणजेच 35 वर्षांनंतर एखादा वेगवान गोलंदाज भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळेल. आतापर्यंत 35 गोलंदाज खेळाडूंनी कसोटी फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे, म्हणजेच बुमराह असं करणारा 36 वा खेळाडू ठरणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ 2-1 ने आधीच आघाडीवर आहे. अशा स्थितीत पाहुण्या संघाने 100 वी कसोटी अनिर्णित ठेवली तरी मालिका आपल्या नावावर करण्यात यश येईल. मात्र, तरीही ही कसोटी सीरिज जिंकण्याची जबाबदारी बुमराहवर आहे. हे वाचा -  इंग्लंडला पहिला वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या इयन मॉर्गनचा राजीनामा
  जसप्रीत बुमराहने 6 वर्षांपूर्वी 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. 2 वर्षांनंतर, म्हणजे 2018 मध्ये, तो त्याच्या कारकिर्दीतील पहिला कसोटी सामना खेळला. त्याने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध 9 कसोटी सामने खेळले असून त्यात त्याच्या नावावर 36 विकेट्स आहेत. नॉटिंगहॅम मात्र त्याला जास्त आवडतं, जिथे त्याने दोनदा 5-5 विकेट घेतल्या आहेत. या संघाविरुद्ध नाबाद 34 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ओव्हल मैदानावर त्याने इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता, ज्यात भारतीय संघाने 157 धावांनी विजय मिळवला होता. बुमराहने त्या सामन्यात एकूण 4 विकेट घेतल्या. हे वाचा - विराटला प्रपोज केलेल्या क्रिकेटरसोबत लंच डेटवर अर्जुन तेंडुलकर; सुरूय लंडनची सैर
  बुमराहच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 29 कसोटी, 70 एकदिवसीय सामने आणि एकूण 57 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 8 वेळा 5 विकेट्स आहेत आणि त्याने या फॉरमॅटमध्ये एकूण 123 विकेट घेतल्या आहेत. तर एकदिवसीय सामन्यात 113 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 67 विकेट्स घेतल्या आहेत.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Cricket news, Jasprit bumrah

  पुढील बातम्या