मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /बुमराह-संजनाच्या लग्नाची चर्चा, सूर्यकुमार यादवचं जुनं ट्वीट होतंय VIRAL

बुमराह-संजनाच्या लग्नाची चर्चा, सूर्यकुमार यादवचं जुनं ट्वीट होतंय VIRAL

टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि स्पोर्ट्स एँकर संजना गणेशन (Sanjana Ganesan) यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत, त्यातच आता सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याचं एक ट्विट सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालं आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 13 जानेवारी : टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) लवकरच लग्न करणार आहे. यासाठी त्याने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टनंतर (India vs England) माघार घेतली. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानेही बुमराहने लग्नासाठी सुट्टी घेतल्याचं सांगितलं. पण बुमराह नक्की कोणाशी लग्न करणार हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे. सुरुवातीला बुमराहचं लग्न दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरनसोबत (Anupama Parmeswaran) होईल असं बोललं गेलं. अनुपमा राजकोटला आल्यामुळे या चर्चांना हवा मिळाली, पण तिच्या आईने या चर्चा फेटाळून लावल्या. यानंतर स्पोर्ट्स एँकर संजना गणेशन (Sanjana Ganesan) याच्यासोबत बुमराहचं नाव जोडलं गेलं. 14 आणि 15 मार्चला गोव्यात या दोघांचं लग्न होईल, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या, पण या दोघांपैकी कोणीही या वृत्ताला अजून दुजोरा दिलेला नाही.

एकीकडे बुमराह आणि संजनाच्या लग्नाच्या चर्चा जोरात सुरू असताना सूर्यकुमार यादवचं (Suryakumar Yadav) एक जुनं ट्वीट सध्या व्हायरल होत आहे. 'हसा, कारण आता फक्त दोन दिवस उरले आहेत,' असं ट्विट संजना गणेशनने आयपीएल 2020 सुरू व्हायच्या दोन दिवस अगोदर केलं होतं. या ट्विटवर रिप्लाय करताना तू कोणाच्या बाजूने आहेस, असा प्रश्न सूर्यकुमार यादवने विचारला होता. याचसोबत त्याने हसण्याची एक स्माईलीही टाकली होती.

कोण आहे संजना गणेशन?

संजनाने आयपीएल आणि 2019 वर्ल्ड कपमध्ये एँकरिंग केलं आहे. तसंच ती कोलकाता नाईट रायर्डस या आयपीएलच्या टीमसाठीही एँकरिंग करते. संजनाने एमटीव्हीचा रियलिटी शो स्पिल्ट्स व्हिलामधून टीव्हीवर पदार्पण केलं. 2013 साली तिने फेमिना गॉर्जियस हा पुरस्कार जिंकला होता. पुण्याच्या प्रसिद्ध कॉलेजमध्ये संजनाने इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं, पण यानंतर ती मॉडेलिंगच्या क्षेत्रात वळली. 2014 साली ती मिस इंडियाच्या फायनलपर्यंत पोहोचली होती.

संजनाने आयपीएलमध्ये केकेआर डायरीज नावाचा कार्यक्रमही केला. 2016 साली ती कोलकात्याच्या टीमशी जोडली गेली आणि नाईट क्लब नावाचा शोदेखील ती करायची.

First published:
top videos

    Tags: Cricket news, Jasprit bumrah